Goa Road Problem Dainik Gomantak
गोवा

Ponda Road Problem: चर खोदल्याने फोंड्यात वाहतूक कोंडी

Ponda Road Problem: धूळ प्रदूषणाचाही त्रास:अनेक आजारांनी शहरवासीय त्रस्त

दैनिक गोमन्तक

Ponda Road Problem: सध्या एकीकडे फोंडा शहरात रस्त्याच्या हॉटमिक्सिंगचे काम सुरू असले तरी चर खोदण्याचे सत्र मात्र थांबलेले दिसत नाही.त्यामुळे एकीकडे डांबरीकरण तर दुसरीकडे खोदकामे अशी सध्या फोंड्याचे चित्र दिसत आहे. वारंवार चरी खोदल्या जात असल्याने शहरासह परिसरातही धूळ प्रदूषण वाढत आहे. सध्या फोंडावासीय खोकला, ताप तसेच श्‍वसनाच्या विकारांनी त्रस्त असून खोदकाम कधी संपणार, हा प्रश्‍न सर्वांना सतावत आहे.

आधीच शहरातील वाहतूक बेफाम झाली असून मुख्य रस्त्यावरच चर खोदल्यामुळे वाहने कशी हाकावीत, हाही प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे. यामुळे सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याला खरेतर नियोजनाचा अभाव हेच प्रमुख कारण असून डांबरीकरण सुरू असताना चर कसे काय खोदले जातात, असे नागरिकांना वाटू लागले आहे.

मुख्य म्हणजे ही खोदकामे पावसाळ्यापर्यंत तरी संपणार, का हेही कळेनासे झाले आहे. पावसाळ्यात कामे बंद व पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबरपासून पुन्हा खोदकामे सुरू, असे सत्र गेली कित्येक वर्षे सुरू आहे.

कधी वीजवाहिन्या, तर कधी दूर संचारच्या केबल्स घालण्याकरिता किंवा गॅस वाहिनी तसेच मलनिस्सारणच्या प्रकल्पाकरिता हे खड्डे खोदले जात आहेत.

याबाबतीत कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी हॉटमिक्सिंग झाल्यावर खड्डे खोदण्याची कामे बंद होतील, असे आश्‍वासन दिले होते. पण वारखंडे येथील मुख्य रस्त्याचे हॉटमिक्सिंग जवळजवळ पूर्ण झाले असूनही खोदकामे संपलेली नाहीत.

ही खोदकामे वाहनचालकांच्या जीवाशी खेळणारी असून रात्री हे खोदलेले खड्डे दिसत नसल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. सध्या उत्तर नसलेला हा प्रश्‍न बनला असून संबंधितानी हा प्रश्‍न एकदा संपवावा, अशी मागणी फोंडा व आसपासच्या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त वाहनचालकांनीही काम संपवण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT