Goa Farming: मयेत शेतीसाठी तिळारीचे पाणी

Goa Farming: शेतीसाठी तिळारी कालव्यातून पाणी वळविण्याच्या शासनाच्या प्रकल्पाचा मयेतील शेकडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
Tilari Dam
Tilari Dam Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Farming: शेतीसाठी तिळारी कालव्यातून पाणी वळविण्याच्या शासनाच्या प्रकल्पाचा मयेतील शेकडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या जलवाहिन्या टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे काम जलसिंचन खात्यामार्फत हाती घेतले असून तिळारी कालव्यातील हे पाणी डोंगराळ भागात बांधण्यात येणाऱ्या टाकीत साठवले जाणार आहे.

हे पाणी जलवाहिनीतून मये तलावात सोडण्यात येईल. परिणामी मये तलावाच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. तसेच जलवाहिनीला विविध भागात चेंबर्स उभारून शेतीसाठी पाणी पुरवले जाणार आहे.

Tilari Dam
Mapusa News: म्हापसा मासळी मार्केटमध्ये गरोदर महिला पडून जखमी

या भागात होणार फायदा

हळदणवाडी, केळबाईवाडा, अर्धवाडा, गावकरवाडा, पैरा, सिकेरी, वायंगिणी, कुंभारवाडा, तिखाझन, हातुर्ली, देउसभटवाडी, चिंचभटवाडी, तीर्थबाग, जांभूळभाट व सभोवतालच्या परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com