Traffic Plan For Old Goa Exposition Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier Exposition: शवप्रदर्शनासाठी यात्रेकरूंना शटल बससेवा, ४६ दिवसांचा वाहतूक आराखडा तयार; केवळ मुख्यमंत्र्यांची संमती बाकी

Traffic Plan For Old Goa Exposition: जुन्या गोव्यातील वाहतूक आटोक्यात राहावी तसेच यात्रेकरूंची गोवा भेट सुव्यवस्थित व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे

Akshata Chhatre

Traffic Plan For Old Goa Exposition by Transport Department

जुने गोवे: नोव्हेंबर महिन्यात गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा शवप्रदर्शनाचा सोहळा पार पडणार आहे. २१ नोव्हेंबर पासून सुरु होणारा हा सोहळा तब्बल ४६ दिवसांसाठी चालेल आणि दरम्यान येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांसाठी परिवहन संचालनालयाकडून वाहतूक योजनेची आखणी करण्यात आलीये.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील या ४६ दिवसांत जुन्या गोव्यातील वाहतूक आटोक्यात राहावी तसेच यात्रेकरूंची गोवा भेट सुव्यवस्थित व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

परिवहन मंडळाच्या आराखड्यानुसार फोंडा आणि मडगाव येथून एक्सपोजीशनच्या शटल बसेसचा वापर करणाऱ्या यात्रेकरू माजी आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या घराजवळ उतरतील आणि इथून त्यांना दोन मुख्य गंतव्यस्थानांकडे निर्देशित केले जाईल, पैकी एक आहे एला फार्म आणि दुसरे आहे पिंटो गॅरेज.

पिंटो गॅरेज मार्गे जाणारी बसेस जुन्या गोव्यातील पंचायत घराजवळ एक थांब घेतील. हा आराखडा सध्या अंतिम टप्यात असून मुख्यमंत्र्यांकडून याचा आढावा घेतला जातोय.

शवप्रदर्शनाच्यावेळी खासगी वाहनाच्या वापरावर निर्बंध असल्याने खासगी वाहन चालकांना गाडी पार्क करण्यासाठी ठराविक जागा देण्यात आल्या आहेत आणि इथून पुढे चर्चसाठी ते शटल बसचा वापर करू शकतात. खासगी वाहनांवर निर्बंध लावल्याने चर्च जवळील वाहतूक आटोक्यात राहायला मदत मिळेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

डेम्पो शिपयार्डजवळील बचिया प्रॉपर्टी, ओल्ड गोवा एज्युकेशन सोसायटी शाळेचे मैदान आणि माँटफोर्ड ग्राउंड या तीन जागा पूर्वी खासगी गाड्यांच्या पार्किंगसाठी आखून देण्यात आल्या होत्या ज्यात आता हेलिपॅडची जागा देखील जोडण्यात आली आहे. हेलिपॅडवरून यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसेस जुने गोवा पेट्रोल पंपाच्या दिशने जातील आणि पांडुरंग मडकईकर यांच्या घराजवळून चर्चच्या दिशेने वळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT