चोर्ला घाट मार्गात झाडे पडल्याने झालेला वाहतुकीचा खोळंबा Dainik Gomantak
गोवा

Goa: चोर्ला घाटात झाडे पडून वाहतुकीचा खोळंबा

चोर्ला घाटाच्या (Chorla Ghat , connecting Goa to belgaum) अंजुणे धरण परिसर आणि जांभळीकडे येथील घाट मार्गावर आज दुपारी झाडे पडल्याने घाट मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला.

Dasharath Morjkar

पर्ये - चोर्ला घाटाच्या ( Chorla Ghat , connecting Goa to belgaum ) अंजुणे धरण परिसर आणि जांभळीकडे येथील घाट मार्गावर आज दुपारी झाडे पडल्याने घाट मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यानंतर वाळपई अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावर पडलेली झाली हटवली. सुरुवातीला अंजुणे भागातील झाडे व नंतर जांभळीकडे भागातील झाड हटवले. वाळपई अग्निशमन दलाचे निरीक्षक संतोष गावस( Santosh Gawas , fire inspector , valpoi fire and emergency services ) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडली. (Traffic jams due to falling trees in Chorla Ghat)

दरम्यान आज ही झाडे पडल्याने या मार्गावरील दोन तास वाहतूक ठप्प झाली होती व त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. झाडे हटवल्यावर केरी वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.

गेल्या दोन महिन्यांपासून या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने घाट मार्गाचा रस्ताच्या बाजू दलदलीत झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्याबाजूची बरीच झाडे वाकलेली असून धोकादायक स्थितीत आहे. तेव्हा रस्त्याबाजूची वाकलेले झाडे तोडावी अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT