फातोर्डा - भांगराळे गोंय अस्मिताय या संस्थेचा यंदाच्या भांगराळो गोंयकार पुरस्कारासाठी प्रसिद्ध नाटककार व साहित्यिक पुंडलीक नारायण नायक (Pundalik Naik) यांची निवड करण्यात आली आहे. यंदापासुनच सुरवात करण्यात आलेल्या स्व. नित्यानंद नाईक स्मृती युवा पुरस्कारासाठी नंदन कुंकळयेकर (Nandan Kunkalyekar) याना हा बहुमान प्राप्त झाला आहे. (Pundalik Narayan Naik selected for Bhangralo Gonyakar Award)
ज्येष्ठ साहित्यीक पुंडलीक नायक यानी भारतीय रंगभुमिला मोठे योगदान दिले असुन त्यांनी लिहिलेली नाटके राष्ट्रीय स्तरावर सादर झालेली आहेत. शिवाय त्यांच्या नाटकांचे हिंदी, मराठी, कन्नड, तामिळ या भाषांमधुन अनुवादीत करण्यात आली आहेत. समिक्षकांनीही त्यांच्या लेखनाची दखल घेतली आहे.
नाटकांबरोबरच एकांकिका, कथा, कविता, गीतलेखन, निबंध, चरित्र लेखन, ललीत लेखन हे विषयही त्यांनी आपल्या लेखणीतुन साकारले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांत गोवा सरकारचा रंगसन्मान, राज्य सांस्कृतिक, संगीत नाटक अकादमी, कोकणी भाषा मंडळ, गोवा कोकणी अकादमी व गोमंत शारदा पुरस्कारांचा समावेश आहे.
गोव्याच्या राजभाषा चळवळीत त्यांचा सहभाग होता. एक प्रभावी वक्ते, आयोजक, संघटक, समिक्षक या नात्याने त्यांनी भारतीय साहित्याला योगदान बहुमुल्य असेच आहे. युवा पुरस्कार प्राप्त झालेले नंदन कुंकळयेकर हे कुशल संघटक, आयोजक व लोकवेद संकलक आहेत.
हे दोन्ही पुरस्कार 8 ऑगस्ट रोजी वेर्णा येथील महाळसा मंदिराच्या सभागृहात प्रदान केले जातील. हा कार्यक्रम त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता सुरु होईल. कार्यक्रमाला कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीधर कामत बांबोळकर. स्मार्टलिंग होल्डिंग कंपनीचे अध्यक्ष कमलाकर नाईक हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम सगळ्या नियमांचे पालन करुनच आयोजित केला जाईल असे अध्यक्ष राजेश प्रभु, नाटक स्पर्धेचे निमंत्रक पकंज नमशीकर व संयुक्त निमंत्रक सुरज कोमरपंत यांनी सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.