Goa Traffic Jam File Photo
गोवा

Chimbel News: ऐन दिवाळीत वाहतूक कोंडी! चिंबल जंक्शनवर रांगाच रांगा; वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

Chimbel Junction: दिवाळीच्या काळात नेहमीच वाहतूक कोंडी होत असूनही पोलिसांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. सकाळापासून संध्याकाळपर्यंत कायम वाहतूक पोलिस ठेवणे गरजेचे असून येथे पोलिस वाहनचालक घाईगडबडीत एका रांगेत जाण्याचे सोडून दोन-दोन लाईन करतात, त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना रस्ता मिळत नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Chimbel Junction Traffic Jam

खांडोळा: चिंबल जंक्शनवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असून रविवारी संध्याकाळी तब्बल तासभर वाहतूक कोंडी झाली. दोन्हीकडे एक किलोमीटरच्या चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये दुचाकी चालक वाहने पुढे पुढे हाकत असल्यामुळे साई मंदिरपर्यंत वाहनांची रांग पोचली होती. या प्रकारामुळे वाहनचालकांना वेळेत पोचले नाहीत. अनेकांना भाऊबिजेसाठी जायचे होते, पण वाहतूक कोंडीमुळे वेळेवर कुठेच जाता आले नाही.

चिंबल जंक्शनवरील या प्रकारामुळे काहींनी आपली वाहने विरुद्ध दिशेने फिरवली. पणजीला येणार वाहने पुन्हा जुने गोवेहून रायबंदरमार्गे पणजीला आली तर पणजीहून जुनेगोवेकडे जाणारी वाहनेही पुन्हा पणजीहून रायबंदर मार्गे जुनेगोवेकडे मार्गस्थ झाली.

या प्रकारामुळे रायबंदर ते जुनेगोवे या खड्डेमय रस्त्यावरही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहने चालविणे कठीण झाले. ही ठिकाणी पुन्हा काम सुरू केल्यामुळे वाहनचालकांना नाहकत्रास सहन करावा लागला.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

दिवाळीच्या काळात नेहमीच वाहतूक कोंडी होत असूनही पोलिसांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. सकाळापासून संध्याकाळपर्यंत कायम वाहतूक पोलिस ठेवणे गरजेचे असून येथे पोलिस वाहनचालक घाईगडबडीत एका रांगेत जाण्याचे सोडून दोन-दोन लाईन करतात, त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना रस्ता मिळत नाही. त्यामुळेच वाहतूक कोंडी होते. हा प्रकार त्वरित बंद करण्यासाठी पोलिसांनी सतर्क व्हावे, एकाच ठिकाणी पोलिस ठेवण्यापेक्षा साईमंदिर ते चिंबल जंक्शनपर्यंत पोलिस ठेवावे, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: हॉटेल, रेल्वे, रस्ते... सर्वत्र ट्रॅकिंग! गोव्यात 'चोरांचा माग' काढण्यासाठी 'रियल-टाईम' प्रणाली आवश्यक

125 वर्षांची कोकणी कला लंडनमध्ये! वर्षा उसगावकर यांनी सादर केलं 'तियात्र'; Video Viral

अग्रलेख: 'घर घर मे दिवाली है, मेरे घर मे अंधेरा' गोमंतकीय सिनेकर्मींची अवस्था

Goa Beach Wedding: परवानगी नसताना घातला मांडव, बीच वेडिंगच्या नादात 1 लाखांचा दंड, गोव्यात घडला अजब प्रकार; वाचा

'अवामी लीग'ला नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र! हसीनांच्या मृत्युदंडामागे राजकीय सूड? - संपादकीय

SCROLL FOR NEXT