Porvorim Flyover Diversion Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover: अखेर दाेन ठिकाणी वाहतूक वळवली! पर्वरी उड्डाणपुलासाठी अधिसूचना जारी

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: पर्वरी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी येथील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून पर्वरीमधील दोन ठिकाणी वाहतूक वळवण्याच्या यशस्वी चाचणीनंतर, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सदर अधिसूचना काढली आहे.

डेल्फिनो सुपरमार्केट ते हॉटेल मॅजेस्टिक आणि श्रेयश नर्सरी ते सांगोल्डा जंक्शनदरम्यानची वाहतूक महामार्ग प्रकल्प पूर्ण होईपर्यंत वळवली जाईल, असे उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते यांनी सांगितले.

सहापदरी महामार्ग कॉरिडॉरच्या बांधकामाला प्रकल्पाच्या दोन्ही टोकांवर काम सुरु होईल. त्यानंतरच्या टप्प्यात, एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या मध्यवर्ती भागाचे बांधकाम हाती घेण्यात येईल. डेल्फिनो सुपरमार्केट ते हॉटेल मॅजेस्टिकपर्यंत, ओ-कोकेरोकडून येणारी आणि पणजीकडे जाणारी सर्व वाहने बाबा रामदेव बस स्टॉपजवळील सर्व्हिस रोडवर वळवली जातील. नंतर, वाहतूक अटल सेतू मार्गे व जलस्त्रोत मुख्यालयाजवळ जाण्यासाठी आझाद भवन जंक्शन येथील महामार्गावर परत विलीन होईल.

टीचर्स ट्रेनिंग कॉलेज ते हिरो होंडा जंक्शनपर्यंतचा सर्व्हिस रोड आता ओ-कोकेरो जंक्शन ते पणजीकडे जाणार्‍या वाहतुकीसाठी एकेरी मार्ग असेल. पणजी-म्हापसा मार्गावरील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु राहील. पणजीकडून येणारा व पर्वरीच्या अंतर्गत रस्त्यांवरुन जाणारी वाहतूक सक्तीने हिरो होंडा जंक्शनवरुन संजय स्कूल व स्वामी विवेकानंद रस्त्याकडे उजवीकडे वळणे आवश्यक आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

श्रेयश नर्सरी ते सांगोल्डा जंक्शनपर्यंतच्या दुसर्‍या वळणाच्या बाबतीत, पर्वरीकडून म्हापसा व मागे जाणारी वाहने सांगोल्डा-सुकूर जंक्शनवरील सर्व्हिस रस्त्यांकडे वळवतील. तसेच ट्रेलर, कंटेनर इत्यादी अवजड वाहने बांदा येथून येणारी व पेडणे, बार्देश आणि तिसवाडीच्या दिशेने जाणारी पत्रादेवी, सक्राळ, तोरसे, तामोशे, उगवे व रेडकर हॉस्पिटलजवळ सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत थांबतील.

ते रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत चालतील. काही अवजड वाहने घोटनिचो व्हाळजवळ वळवली जातील व करासवाडा थिवी आयडीसी-अस्नोडा-डिचोली-साखळी-आमोना मार्गे त्यांच्या गतव्यस्थानाकडे जातील, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यां अधिसूचनेनुसार, बांदा येथून येणाऱ्या व डिचोली, सत्तरी, तिसवाडी व दक्षिण गोव्याकडे जाणाऱ्या अवजड मालाच्या वाहनांना बांदा येथे वळवावे लागेल व दोडामार्ग-बिचोलीमार्गे दिवसा व रात्री जावे लागेल.

मार्शल नियुक्त करा

गित्ते यांनी प्रकल्पाच्या कामासाठी काही अटी घातल्या आहेत. कंत्राटादाराला त्यांची यंत्रणा व साम्रगी सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व मोक्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त ट्रॅफिक मार्शल नियुक्त करावे लागतील. त्यांनी असेही म्हटले आहे, की सर्व डायव्हजर्न ठिकाण रात्रीच्या वेळी चांगले प्रकाशित केले पाहिजेत. जेणेकरुन वाहन चालकांना रात्रीच्या वेळी अंदाज येण्यास मदत होईल.

सूचनाफलक अनिवार्य

अटींमध्ये सर्व मोक्याच्या ठिकाणी नो-एण्ट्री, डावीकडे-उजवीकडे सक्ती, थांबणे-पार्किंग नसणे, यासारखे सूचनाफलक लावणे अनिवार्य आहे. बॅरिकेडिंग, डायव्हर्शनसाठी वापरलेले साहित्य देखील फ्लोरोसेंट रंगाने व टेप रंगरंगोटी करावे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier's Exposition: पोप फ्रान्सिस यांना निमंत्रित करण्यात भाजपचे डबल इंजिन सरकार अपयशी !!

'World Pharmacist Day' निमित्य औषधविक्रेत्यांचे आरोग्य प्रणालीतील स्थान, कोविड काळातील सेवा, लसीकरणातली भूमिका याबद्दल जाणून घ्या..

Vegetable Rates: मुसळधार पावसाचा फटका; गोव्यात भाज्यांचे दर वाढले

Ponda Crime: ..'संशय' आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा! वाढत्या चोऱ्या आणि गुन्ह्यांवरून नागरिकांना 'सतर्क' राहण्याचे आवाहन

Bicholim News: रंब्लर्समुळे वाढली डोकेदुखी! 'डिचोली-साखळी' रस्त्यावर वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

SCROLL FOR NEXT