Porvorim Flyover: उड्डाण पुलाच्या कामासाठी वाहतूकीची चाचणी; चालकांची मात्र तारांबळ

Porvorim: चाचणीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केल्यानंतर ही वाहतूक वळवण्यास प्रारंभ होईल
Porvorim: चाचणीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केल्यानंतर ही वाहतूक वळवण्यास प्रारंभ होईल
Flyover Canava
Published on
Updated on

पणजी: पर्वरी येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित उड्डाण पुलाच्या कामासाठी आज वाहतूक प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात आली. त्यासाठी पर्वरी बाजार जंक्शन व तीन बिल्डिंग जंक्शन येथे म्हापशाहून पणजीकडे येणारी वाहतूक वळवण्यात आली. या चाचणीवेळी वाहतूक संथगतीने सुरू होती. काही रुग्णवाहिकांना वाट करून देताना वाहन चालकांची तारांबळ उडाली.

अनेकांनी गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली. चाचणीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केल्यानंतर ही वाहतूक वळवण्यास प्रारंभ होईल, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली.

विधानसभा सुरू असताना उड्डाण पुलाच्या कामासाठी पर्वरीतील काही भागातील वाहतूक सर्व्हिस रस्त्यावरून वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्यावेळी पर्वरीच्या स्थानिकांनी त्याला विरोध केला होता. कोणतीही चाचणी न घेता वाहतूक वळवण्यात आल्यास वाहन चालकांचा गोंधळ उडू शकतो, अशी मते व्यक्त केल्यावर मंत्री रोहन खंवटे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला हा निर्णय पुढे ढकलण्याची सूचना केली.

त्यानुसार ती पुढे ढकलून त्याची चाचणी आज ठेवण्यात आली होती. पर्वरी रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होत असल्याने ज्या जंक्शनवर वाहने वळवण्यात येणार होती, तेथे अडथळे लावून वाहतूक पोलिस सकाळी पहाटेपासूनच तैनात करण्यात आले होते. वाहन चालकांना वळवण्यात आलेले सुमारे दीडशे मीटरचे रस्ता अंतर कापण्यास बराच वेळ लागत होता. वाहनांच्या रांगा लागत होत्या मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे वाहतुकीची कोंडी झालेली दिसली नाही.

पर्वरी जुना बाजार जंक्शनजवळ गिरीच्या बाजूने दोन्हीकडे सर्व्हिस रोडवर काँक्रीट घालून डायर्व्हजन फलक उभारले आहे, तर डेल्फिनो येथील तीन बिल्डिंग जंक्शनवरील म्हापसा ते पणजीची वाहतूक डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडवर वळविण्यात येणार आहे. यासाठी तिथेही डायर्व्हजन फलक व महामार्ग ते सर्व्हिस रोड रस्ता काँक्रिट घालून जोडण्यात आला आहे.

उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम हाती घेतल्यानंतर महामार्गावरील वाहन वाहतूक व्यवस्थापनावर कोणता ताण पडेल. वाहन वाहतूक सुरळीत होण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवता येईल, याचा अभ्यास या चाचणीवेळी करण्यात आला.

Porvorim: चाचणीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केल्यानंतर ही वाहतूक वळवण्यास प्रारंभ होईल
Porvrorim Flyover: पर्वरीत 475 कोटी रूपये खर्चून होणार नवा उड्डाणपूल

पर्वरीवासीयांची गैरसोय

हा वाहतूक बदल करताना पर्वरीतील रहिवाशांचा फारसा विचार न केल्याने त्यांना आज गैरसोयीला सामोरे जावे लागले. श्री महारूद्र हनुमान मंदिराकडून तीन बिल्डिंगकडून म्हापशाच्या दिशेने वळणारा रस्ता वाहतुकीस बंद न केल्याने त्या मार्गाने म्हापशास जाण्यासाठी येणाऱ्यांना सेवा रस्ता मार्गे साई सर्विसपर्यंत दोन किलोमीटर जात उजवीकडे वळून म्हापशाकडे जावे लागत होते. मराठी भवनकडून डीएड महाविद्यालयाकडे येण्यासाठी सेवा रस्त्याच्या वापर करणाऱ्यांना सेवा रस्ता एकेरी झाल्याने डावीकडे वळून महामार्गावरून डीएड महाविद्यालयाकडे जावे लागत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com