Goa Police Traffic Advisory Dainik Gomantak
गोवा

Goa Police Traffic Advisory: पणजी, कळंगुट, हणजूणमध्ये वाहतूक कोंडीची शक्यता; वाहतूक खात्याकडून प्रवाशांसाठी सूचना जारी

Traffic Management In Goa For New Year: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राजधानी पणजीसह राज्यातील किनारी भागात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोवा पोलिसांकडून खबरदारी घेतली जातेय.

Manish Jadhav

नव्या वर्षाचं (2025) दणक्यात स्वागत करण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गोव्यात पोहोचले आहेत. तत्पूर्वी, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राजधानी पणजीसह राज्यातील किनारी भागात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोवा पोलिसांकडून खबरदारी घेतली जातेय. पोलिसांकडून अॅडवायजरी जारी करण्यात आलीय.

वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात यासारख्या घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिस सर्तक झाले आहेत. गोमंतकीय आणि देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांनी सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिसांकडून आवाहान करण्यात आलेय.

गजबजलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता!

दरम्यान, राजधानी पणजी (Panaji), कळंगुट, बागा, कांदोळी, हणजूण तसेच मडगाव यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणी पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांकडून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन करण्यात आलेय.

बेकायदा पार्किंगवर होणार कारवाई

पर्यटकांनी (Tourists) गजबजून गेलेल्या संबंधित ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीय. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच, वाहतूक सुरळित करण्यासाठी बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलेय.

मद्यपान करुन वाहने चालवू नका

नववर्ष साजरे करताना मद्यपान करुन वाहने चालवू नये असा आदेशही वाहतूक खात्याकडून काढण्यात आलाय. मद्यपान करुन वाहने चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही वाहतूक खात्याकडून देण्यात आलीय. यासाठी जागोजागी वाहतूक पोलिसांची पथके तैनात करण्यात आलीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT