Goa Police: कायदा हातात घ्याल तर...! 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांची तंबी

Goa tourism safety measures: किनाऱ्यांवरील प्रत्येक हालचालीवर पोलिस बारीक लक्ष ठेवणार आहेत. त्यादृष्टीने ठिकठिकाणी पेट्रोलिंग सुरु करण्यात आल्याचे कोलवाचे पोलिस निरीक्षक थेरोन डिकॉस्ता यांनी सांगितले.
Goa tourist safety New Year
Crime prevention measures in Goa on December 31X
Published on
Updated on

Goa Coastal Police Security

फातोर्डा: जगभरात प्रसिद्ध असलेल्या दक्षिण गोव्यातील कोलवा व अन्य समुद्र किनाऱ्यांवर ३१ डिसेंबर रोजी होणारे गुन्हे रोखण्यासाठी तसेच पर्यटकांना सुरक्षा पुरवण्यासाठी पोलिस विभाग कामाला लागला आहे. किनाऱ्यांवरील प्रत्येक हालचालीवर पोलिस बारीक लक्ष ठेवणार आहेत. त्यादृष्टीने ठिकठिकाणी पेट्रोलिंग सुरु करण्यात आल्याचे कोलवाचे पोलिस निरीक्षक थेरोन डिकॉस्ता यांनी सांगितले.

याविषयी टुरिस्ट पोलिस, स्थानिक पंचायत, स्थानिक पोलिस, जीवन रक्षक व संबंधित इतर अधिकाऱ्यांची बैठक बोलावून व्यवस्थेचा आढावा घेतल्याचे तसेच आवश्‍यक सूचना देण्यात आल्याचे डिकॉस्ता यांनी यावेळी सांगितले.

Goa tourist safety New Year
Goa Police: "काही कुजक्या फळांमुळे सर्वच बदमान होतायत" डीजीपींकडून पोलिसांच्या डागाळलेल्या प्रतिमेवर खेद व्यक्त

३१ डिसेंबरची मध्यरात्री पर्यटकांची कोलवापासून पमाजोर्डा, केळशीपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक व स्थानिकांची मोठी गर्दी असते. सरकारी आदेशानुसार उघड्यावर मद्यप्राशन करणे, जेवण करणे, मद्य पिऊन गाडी चालविणे, अमलीपदार्थ सेवन करणे, कर्णकर्कश आवाजाने संगीत वाजविणे, वेळेच्‍या मर्यादेचे उल्‍लंघन करून संगीत वाजविणे, बेदरकार वाहन चालविणे, झगडे-तंटे अशा प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पेट्रोलिंग सुरू केल्याचे डिकॉस्ता यांनी सांगितले.

Goa tourist safety New Year
Goa Police: 'शिकारी' पोलिसांच्या रडारवर; सत्तरी गोळीबार मृत्यूप्रकरणात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता

कायदा हातात घेतल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे व गुन्हा दाखल करण्यात येणार असे ते म्हणाले. सध्या २० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या फेऱ्या सतत आळीपाळीने सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com