
वाळपई: पाटवळ, सत्तरी येथे शिकार व एकाचा गोळी लागून झालेल्या मृत्यूप्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली असून या प्रकरणात गुंतलेल्या आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी चिंचमळ, म्हाऊस येथील काही घरांची झडती घेतली.
न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित बाबू उमर संघार आणि गाऊस नुर अहमद पटेल यांनी दिलेल्या जबानीवरून वाळपई पोलिसांनी शुक्रवारी संशयित राहत असलेल्या चिंचमळ, म्हाऊस येथील भागातील घराघरात तपासणी करण्यास सुरवात केली आहे.
आणखी काहीजण रडारवर
पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी आणि पोलिस निरिक्षक विदेश शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून अटक केलेल्या संशयितांनी आणखी काहीजणांनी नावे सांगितली आहेत. त्यानुसार तपासाला सुरवात केली असून चिंचमळ, म्हाऊस येथील काही घरांची झडती घेण्यात आली आहे. घइमालक व भाडेकरूंची तपासणी केली जात आहे. भाडेकरू पडताळणी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
गाडी, बंदूक मालकाचा शोध सुरू
शिकारी दरम्यान वापरलेली गाडी तसेच बंदूक कोणाची, हा प्रकार घडला त्यावेळी आणखी कितीजण होते याचादेखील शोध घेण्यात येत आहे. तसेच शिकार केल्यानंतर ते जनावर कोणाला विकायचे याचाही शोध घेण्यात येत आहे. काही धागेदोरे हाती लागले असून त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.
शनिवारी देखील होणार घरांची झडती
शुक्रवारी वाळपई पोलिसांची फौज चिंचमळ, म्हाऊस येथे पोचल्यानंतर पोलिस उपअधिक्षकांच्या सूचनेनुसार पोलिसांचे पाच गट करून प्रत्येक घरात झडती घेण्याचे काम सुरू करण्यात आले. संध्याकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. उर्वरित घरांची झडती शनिवारी घेतली जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.