Porvorim traffic jam Dainik Gomantak
गोवा

Porvorim traffic jam: प्रयोग फसला, ट्रायल रनमध्येच उडाला वाहतुकीचा फज्जा; पर्वरी तुंबली

Major Traffic Jam In Porvorim Goa: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पर्वरी ते गिरी उन्नत मार्ग प्रकल्पासाठी काही मार्ग बंद करण्याच्या तयारीचा हा भाग होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते बंदीच्या चाचणीदरम्यान सोमवारी (१३ ऑक्टोबर) सकाळपासून दुपारपर्यंत पर्वरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. सकाळी १० ते दुपारी १ वा. या वेळेत करण्यात आलेल्या या चाचणीमुळे वाहनांची लांबलचक रांग लागली आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पर्वरी ते गिरी उन्नत मार्ग प्रकल्पासाठी काही मार्ग बंद करण्याच्या तयारीचा हा भाग होता. या कालावधीत वाहनांना अरुंद सेवा मार्गावर वळवण्यात आले, ज्यामुळे परिसरात तीव्र कोंडी झाली.

चाचणीदरम्यान आराडी जंक्शन होली फॅमिली चर्च जंक्शन आणि ओ-कोकेरो जंक्शन-शिवाजी चौक भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. केवळ आपत्कालीन वाहनेच या मागनि जाण्यास परवानगी देण्यात आली होती.

जड वाहनांना पणजीकडे जाण्यासाठी करासवाडा-डिचोली मागनि वळवण्यात आले, तर म्हापशाकडे जाणाऱ्या वाहनांना पणजी-फोंडा साखळी-डिचोली-अस्नोडा-थिवी या पर्यायी मागनि जाण्याचे निर्देश देण्यात आले. हलकी वाहने सुकूर आणि बी.बी. बोरकर मार्गे पणजीकडे, तर म्हापशाकडे जाणारी वाहने चोगम रोड, सांगोल्डा आणि गिरीमार्गे वळवण्यात आली.

सार्वजनिक वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही वाहतूक चाचणी मुख्य बंदीपूर्वी समस्या असलेल्या ठिकाणांची ओळख पटवण्यासाठी आणि वाहतूक नियोजन अधिक सुरळीत करण्यासाठी केली होती. त्यांनी आश्वासन दिले की, प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामादरम्यान स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना रस्त्यांवर प्रवेश देण्यात येईल. तसेच वाहतूक नियंत्रक कर्मचारी आणि स्पष्ट दिशादर्शक फलकांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT