घरदुरुस्ती, विभाजन प्रक्रिया सोपी होणार; 'माझे घर' योजनेमुळे मयेवासीयांना मिळणार घरांचा मालकी हक्क

Majhe Ghar scheme Goa: 'माझे घर' ही ऐतिहासिक योजना असून, या योजनेमुळे प्रत्येकाला हक्काचे घर मिळणार आहे.
Goa government housing initiative
Majhe Ghar scheme GoaPramod Sawant - X Handle
Published on
Updated on

डिचोली: 'माझे घर' योजनेमुळे मयेवासीयांना आता घरांचा मालकी हक्क प्राप्त होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे यापुढे घरदुरुस्ती किंवा विभाजन करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या 'माझे घर' योजनेच्या अर्ज वितरणाचा मयेतून शुभारंभ केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 'माझे घर' योजनेचा लाभघेण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Goa government housing initiative
गोव्याचे मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री अडचणीत सापडणार? रामा काणकोणकरांच्या आरोपानंतर मारहाण प्रकरणाचा तिढा वाढला

मये येथील पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या या सोहळ्याप्रसंगी राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष धाकू मडकईकर, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकीत यादव, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी नेहाल तळवणेकर, सरपंच वासुदेव गावकर, शंकर चोडणकर, महेश सावंत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच या सोहळ्यास मये मतदारसंघातील विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि पंचसदस्य उपस्थित होते.

Goa government housing initiative
Goa Tourism: टॅक्सी, लॉजिंग, सीफूड झाले स्वस्त! GST कमी झाल्याने गोव्यात खिशाला परवडणाऱ्या पैशात करता येणार पर्यटन

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निवडक लाभधारकांना अर्ज वितरित करण्यात आले. दत्तात्रय परब यांनी सूत्रसंचालन केले. नेहाल तळवणेकर यांनी आभार मानले.

ऐतिहासिक योजना

'माझे घर' ही ऐतिहासिक योजना असून, या योजनेमुळे प्रत्येकाला हक्काचे घर मिळणार आहे. सर्वसामान्यांचे हित नजरेसमोर ठेवून पूर्ण अभ्यासाअंती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही योजना अमलात आणली आहे, असे सदानंद शेट तानावडे यांनी यावेळी सांगून, ही योजना मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली. या योजनेबद्दल होणाऱ्या अपप्रचाराला जनतेने बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com