traffic challan government vehicle  Dainik Gomantak
गोवा

Traffic Challan: सरकारी गाडीलाही 'तालांव'!! बेशिस्त पार्किंग महागात पडलं; वाहतूक विभागाचं नागरिकांकडून कौतुक

government vehicle illegal parking: वाहतूक खात्याने एका सरकारी गाडीलाही बेशिस्त पार्किंग केल्याबद्दल दंड ठोठावला आणि या कारवाईचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे

Akshata Chhatre

Government Vehicle Traffic Challan: गोव्यात बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाची करडी नजर असते आणि नियम मोडल्यास दंड आकारला जातो. मात्र, आता या नियमातून सरकारी गाड्यांनाही सूट दिली जात नसल्याचे एका घटनेतून समोर आले आहे. सोमवारी (दि. २६) रोजी वाहतूक खात्याने एका सरकारी गाडीलाही बेशिस्त पार्किंग केल्याबद्दल दंड ठोठावला, आणि या कारवाईचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

सरकारी गाडीला दणका

पणजी शहरात एका वर्दळीच्या वळणावर एससी/एसटी गोवा कमिशन विभागाच्या अध्यक्षांची एक गाडी उभी होती. ही गाडी अशा ठिकाणी पार्क केली होती, ज्यामुळे इतर वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण होत होता आणि वाहतूक कोंडी झाली होती.

बराच काळ ही गाडी तिथेच उभी असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. याबद्दल वाहतूक विभागाकडे तक्रार येताच, त्यांनी तात्काळ दखल घेतली. कोणतीही सरकारी गाडी असली तरी, नियमांचे उल्लंघन होत असल्याने वाहतूक विभागाने कोणतीही कसूर न करता या गाडीच्या नावावर दंड ठोठावला.

प्रशासनाकडून नियमांचे पालन, नागरिकांकडून प्रशंसा

वाहतूक विभागाकडून वेळोवेळी बेशिस्त वाहतूक आणि पार्किंगच्या प्रकरणांची नोंद घेतली जाते. मात्र, या कारवाईमधून सरकारी वाहनांना देखील सूट दिली जात नसल्याने वाहतूक विभागाच्या या कामाची अनेकांकडून प्रशंसा केली जात आहे. वाहतुकीचे नियम सर्वांसाठी सारखेच असावे, अशी नागरिकांची अपेक्षा असते आणि या घटनेमुळे प्रशासनाने नियमांचे पालन करण्यात कोणतीही दुहेरी भूमिका घेतली नाही, हे सिद्ध झाले आहे. अशा प्रकारच्या कठोर कारवाईमुळे भविष्यात बेशिस्त पार्किंगला आळा बसेल आणि वाहतूक अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

SCROLL FOR NEXT