Goa Traffic Challan: वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या 29 हजार 338 जणांना पाठवले दंडाचे चलन

गोवा वाहतूक संचलनालयाची कारवाई
Goa Traffic Violation
Goa Traffic ViolationDainik Gomantak

Goa Traffic Challan: गोव्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभुमीवर राज्यातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही, सिग्नल बसवले गेले. तसेच काही स्मार्ट सिग्नल्सचे ऑटोमेटिक नियंत्रण राखले जात आहे.

Goa Traffic Violation
Goa Medical College: राज्य माहिती आयोगाची 'गोमॅको'च्या अधिकाऱ्याला नोटीस; 'आरटीआय'अंतर्गत दिली होती अपुरी माहिती

दरम्यान, सरकार असे विविध प्रयत्न करत असतानाच वाहतुकीचे नियम धाब्याबर बसवून गाडी चालवणाऱ्या एकूण 29 हजार 338 वाहनधारकांना दंडाचे चलन पाठविण्यात आले आहे. गेल्या चार महिन्यातील ही आकडेवारी आहे.

मे महिन्यात 737, जून महिन्यात 11हजार 187 , जुलै महिन्यात 7251 तर ऑगस्ट महिन्यात 10 हजार 163 अशा एकूण मिळून 29 हजार 338 जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

Goa Traffic Violation
Goa High Court: उच्च न्यायालयाकडून निकालांचे कोकणी, मराठीत भाषांतर करण्यास प्रारंभ

मे महिन्यात राज्यात लहान-मोठे मिळून एकूण 261 अपघात झाले. यात 19 जणांचा मृत्यू झाला. 20 जण जखमी तर 71 जण किरकोळ जखमी झाले होते. जून महिन्यात 231 अपघात झाले. त्यात एकूण 17 मृत्यू झाले तर एकूण 92 जखमी झाले होते.

जुलै महिन्यात 209 अपघातांमध्ये 24 मृत्यू तर 61 जखमी झाले होते. तर ऑगस्ट महिन्यात 232 अपघातांमध्ये 13 मृत्यू झाले तर 94 जखमी झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com