Monsoon Fishing Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing: '..भविष्यात मासेच संपतील'!पारंपरिक मच्छिमारांकडून मासेमारी बंदीचे उल्लंघन; ट्रॉलरमालकांची कारवाईची मागणी

Goa fishing ban violation: कोलवा समुद्र किनाऱ्यावर ट्रॉलरमालक जमले व त्यांनी मासेमारी बंदी सर्वांनाच लागू करावी अशी मागणी केली. सध्या मासेमारी बंदी आहे व यांत्रिकी ट्रॉलर समुद्रात नेण्यास बंदी आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: पारंपरिक मच्छीमार मासेमारी बंदीचे उल्लंघन करीत आहेत. सध्या मासळीचा प्रजनन कालावधी असताना पारंपरिक मच्छीमार मासेमारी करू लागले, तर भविष्यात मासळीचे उत्पादन कमी होईल, अशी भिती ट्रॉलरमालकांनी आज व्यक्त केली.

कोलवा समुद्र किनाऱ्यावर ट्रॉलरमालक जमले व त्यांनी मासेमारी बंदी सर्वांनाच लागू करावी अशी मागणी केली. सध्या मासेमारी बंदी आहे व यांत्रिकी ट्रॉलर समुद्रात नेण्यास बंदी आहे. पारंपरिक मच्छीमार लहान होडी घेऊन मासेमारी करु शकतात, पण ते मोनोट्वाईन जाळे घेऊन समुद्रात जातात.

मोनोट्वाईन जाळ्याला गोव्यात बंदी आहे. त्याच प्रमाणे त्यांना एक लहान ९ एचपी मोटर बोट घेऊन मासेमारी करण्याची मुभा आहे. पण ते दोन तीन मोटर घेऊन जातात. ते समुद्राच्या दूरपर्यंत सुद्धा जात नाहीत, तर किनाऱ्यावरुन काही अंतरावर जाऊन मासेमारी करतात व हा प्रकार गोव्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर चालू आहे, असे ट्रॉलर मालक सॅबी कार्दोज यांनी पत्रकारांना सांगितले.

हे पारंपरिक मच्छीमार उघडपणे मासेमारी बंदीचे उल्लंघन करीत आहेत. आम्ही मच्छिमार खात्याला याबद्दल कळविले आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे उच्च न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन आहे. त्यांमुळे उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केल्याची माहिती ट्रॉलर मालक हर्षद धोंड यांनी दिली.

दरम्यान मत्स्यव्यवसाय खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्ही पारंपरिक मच्छिमारांच्या बोटी पाहिल्या आहेत. आम्ही खात्याच्या उच्च पदस्थाना यांची कल्पना दिली आहे. बोटी किनाऱ्यावर आल्यावर तपासणी केली जाईल असे त्यांनी सांगितले.

रापणकारांतर्फे बाणावलीत ‘मार्ग विधी’ उत्साहात

गोव्यातील पारंपरिक रापणकार, मच्छीमार मासेमारीला सुरुवात करण्यापूर्वी समुद्र किनाऱ्यावर मार्ग विधी करतात. आज हा विधी बाणावली समुद्र किनाऱ्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. बाणावली येथील होली ट्रिनिटी चर्चचे फादर क्लिफर्ड फर्नांडिस यांनी यावेळी प्रार्थना केली.

फा. फर्नांडिस म्हणाले, गोव्यातील ही परंपरा अजूनही रापणकार पाळतात. ही परंपरा आमच्या पूर्वजांनी सुरू केली होती, ती आम्ही अजूनही पाळली जाते. मच्छीमार पेले फर्नांडिस म्हणाले, परिस्थितीनुसार आम्ही उद्या किंवा परवा आम्ही समुद्रात जाऊन मासेमारीचा शुभारंभ करणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shivsena: विधानसभेची तयारी? एकनाथ शिंदेची शिवसेना गोव्यात करणार महत्वाची घोषणा

Goa News Live Update: आप अध्यक्ष अमित पालेकर यांनी रस्त्यांची स्थिती दाखवण्यासाठी केले सायकल राईडचे आयोजन

NH 66 Road Closure Goa: पणजीला जायचं कसं? ओ कोकेरो जंक्शन ते मॉल दे गोवा रस्ता 'पाच महिने बंद'

Bandora: उंच पठारांवर पडणारा पाऊस, झऱ्यांचे रूपाने सखल भागांकडे धाव घेतो; बांदोडा गावची जैवविविधता

Pearl Fernandes: भूतानमध्ये गोमंतकीय 'पर्ल'चा डंका! सॅफ करंडकमध्ये भारताने नमवले बांगलादेशला

SCROLL FOR NEXT