Mapusa Market  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : व्यापाऱ्यांची पालिकेवर धडक; भाडेवाढ मागे न घेतल्यास ‘मार्केट बंद’चा इशारा

Mapusa News : सुमारे अडीज तास पालिकेत ठिय्या मांडून बसल्यानंतर स्थानिक आमदारांनी आपण याप्रकरणात आवश्यक लक्ष घालून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर व्यापारी माघारी परतले.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News : म्हापसा येथील मार्केटमधील दुकानांच्या भाडेवाढी विरोधात म्हापसा व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, गुरुवारी (ता.१८) सकाळी व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवत पालिकेवर धडक मोर्चा काढला.

सुमारे अडीज तास पालिकेत ठिय्या मांडून बसल्यानंतर स्थानिक आमदारांनी आपण याप्रकरणात आवश्यक लक्ष घालून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर व्यापारी माघारी परतले.

दरम्यान, पालिकेकडून येत्या काही दिवसांत ठोस पाऊल न उचलल्यास, मार्केट बंदचा पर्याय अद्याप खुलाच आहे, असा इशारा व्यापाऱ्यांनी पालिकेतून निघताना दिला.

यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून म्हापसा पोलिस निरीक्षक हे फौजफाट्यासह घटनास्थळी उपस्थित होते.

दुप्पट दरवाढीला आक्षेप

नुकताच झालेल्या म्हापसा पालिका मंडळाच्या बैठकीत पालिकेच्या स्थावर मालमत्ता असलेल्या बाजारपेठेतील दुकानांच्या भाडेपट्टीत साबांखाच्या दरानुसार वाढ करण्याचा ठराव घेण्यात आलेला.

त्यानुसार, हा नवीन दर १५२ रुपयांवरुन २९६ रुपये प्रती चौरस मीटर करण्यात आला. या दुप्पट दरवाढीला व्यापाऱ्यांचा तीव्र आक्षेप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT