Trade Union Leader and well known mining activist Puti Gaonkar joins AAP Dainik Gomantak
गोवा

अरविंद केजरीवालांनी दिला पुती गावकरांना आपमध्ये प्रवेश

खाण अवलंबतांचे प्रश्न मांडणारे पुती गावकर यांना स्थानिक प्रश्नांची जाण आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी : खाण अवलंबतांचे प्रश्न मांडणारे पुती गावकर यांना स्थानिक प्रश्नांची जाण आहे. अशा नेत्यांची ‘आप’ला गरज आहे. राज्यातील स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आप पुढाकार घेणार असून, पुती गावकर यांच्यासारखे नेते पुढे यायला हवेत. साखळी मतदारसंघातून त्यांना लढण्याची इच्छा असेल तर ते मुख्यमंत्र्यांविरुद्ध लढतील, असे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केले.

गोवा मायनिंग पिपल फ्रन्टचे (जीएमपीएफ) समन्वयक पुती गावकर यांनी आज ‘आप’ पक्षात प्रवेश केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी जणू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरुद्ध आपचा नेता जाहीर केला. गावकर यांनी साखळी मतदार संघातून लढण्याची तयारी दाखविली तर आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू तसेच इतर स्थानिक नेत्यांनीही पुती गावकर यांना सहकार्य करावे, असे आवाहनही केजरीवाल यांनी केले. आपल्याला प्रामाणिक पक्ष म्हणून ‘आप’ हाच दिसल्याने मी या पक्षाची निवड केली, असे पुती म्हणाले.

खाण व्यवसाय सुरू करू

राज्यात खाणींचा प्रश्न एरणीवर आहे. या व्यवसायावर अवंलबून असणाऱ्यांचे रोजगार गेले आहेत. अनेकांचे संसार संकटात सापडले आहेत. गोव्यात ‘आप’चे सरकार आल्यास आम्ही अवघ्या सहा महिन्यात खाण व्यवसाय सुरू करणार आहो, असे केजरीवाल म्हणाले.

भंडारी समाजाचा पाठींबा

राज्यात भंडारी समाजाचे मतदार अधिक आहेत. त्यानुसार जो पक्ष भंडारी समाजाच्या नेत्यांना सर्वाधिक उमेदवारी देईल, त्या पक्षाला समाजाचा पाठिंबा राहील आणि तशी भूमिका भंडारी समाजाने घेतली होती. त्यांनी आपचे अरविंद केजरीवाल यांना तसे कळविलेही होते. त्यानुसार, अरविंद केजरीवाल यांनी भंडारी समाजाच्या नेत्यांची भेट घेतली. केजरीवाल यांनी दिल्लीत उत्कृष्ट कार्य केले असून, त्यांनी सर्वसामान्य जनतेचे अत्यंत प्रामाणिकपणे प्रश्न सोडविले आहेत, असे समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक म्हणाले.

दाबोळी विमानतळावर घोषणाबाजी

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचे गोव्यात दाबोळी विमानतळावर दुपारी दीड वाजता आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी ‘आप’चे महादेव नाईक, प्रेमानंद नानोस्कर, राहुल म्हांब्रे, प्रतिमा कुतिन्हो, संदेश तेलेकर, सीसील रॉड्रिगीस व इतर पदाधिकारी व समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दाबोळी विमानतळावरून केजरीवाल बाहेर येताच ‘केजरीवाल तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आमका जाय, आमका जाय केजरीवाल आमका जाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT