देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections) बिगुल अत्तापासूनच वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मतदारासमोर माडंत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस (Congress), तृणमूल कॉंग्रेस, आपसह स्थानिक पक्ष सत्तेत असणाऱ्या भाजपवर (BJP) निशाणा साधत आहेत. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेत गोव्यातील जनतेला रिझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या सगळ्या पाश्वभूमीवर गोवा हे अत्यंत प्रभावशाली असे राज्य आहे. मात्र विकासाच्या नावावर फक्त सरकार लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील मच्छिमार बांधव अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र दिल्ली गोव्याला आपल्या तालावर नाचवत असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला.
दरम्यान, 'दिल्लीप्रमाणेच गोव्यातही विकासकामे येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत. राज्याच्या विकासासाठी सर्व समुदाय आप- आपला कार्यभाग उचलतील. त्याचबरोबर काही मुद्दे मांडण्यात आले आहेत, ज्यावर आपण सर्वजण मिळून चर्चा करुयात. तसेच काही दिवसातच गोमंतक भंडारी समाजाला आमचा निर्णयही कळवू,असंही यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.