Kelshi News: केळशी गावात आणि विशेषतः समुद्र किनाऱ्यावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव जाणवत आहे. ही कुत्री मोठ्या संख्येने असून पर्यटकांवर हल्ले करीत आहेत. प्रकरणी लक्ष घालून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आमदार वेंझी विएगस यांनाही या निवेदनाची प्रत सादर करून या संदर्भात त्वरित उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी केली आहे.
अलिकडे आपण पर्यटकांवर तसेच स्थानिकांवरही हल्ले होत असून याला कोण जबाबादार? ही एक गंभीर समस्या असून पर्यटन व्यवसाय लक्षात घेऊन तातडीने यावर उपाय करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात गोवा अनुभवण्यासाठी कित्येक पर्यटक येथे येतात. त्यांना आम्ही सुरक्षा पुरविणे आवश्यक असल्याचे वाझ यांनी म्हटले आहे. नैसर्गिक आपत्ती कायद्यांतर्गत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी वाझ यांनी शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांच्याकडे केली.
सदर निवेदनाची प्रत बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनाही पाठविण्यात आली आहे. कुत्रे चावे घेत असल्याचे आपल्या नजरेस आणून दिले गेले असून आपण पंचायत, पालिका, पशुसंवर्धन विभाग व पर्यटन विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आवश्यक तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी चंद्रू यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.