Bus Short Circuit
Bus Short Circuit Dainik Gomantak
गोवा

Goa Fire : कुचेलीत टुरिस्ट बसमध्ये शॉर्टसर्किट; परदेशी पर्यटकांचा खोळंबा

आदित्य जोशी

म्हापसाजवळच असलेल्या कुचेली येथे प्रवासी बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. सोमवारी सकाळीच हा प्रकार घडला असून शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या बसमध्ये 29 प्रवासी होते जे नुकतेच दाबोळी विमानतळावर उतरले होते, उत्तर गोव्यातील एका बीचवर सोडण्यासाठी जाणाऱ्या बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे पर्यटकांचा मात्र खोळंबा झाला.

दाबोळी विमानतळावर आज सकाळी कझाकस्तानमधून पर्यटकांना घेऊन विमान दाखल झालं. या विमानातील 29 परदेशी पर्यटकांना आश्वे हरमल भागातील एका हॉटेलमध्ये घेऊन जाणाऱ्या बसला म्हापशाजवळच असलेल्या कुचेली येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या बसमध्ये 29 प्रवासी होते जे सर्वच्या सर्व कझाकस्तानमधून गोवा पाहण्यासाठी आले होते. आग मोठी नसल्यामुळे लगेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांचं सामानही सुरक्षित असल्याची माहिती आहे.

सकाळी बसमध्ये शॉर्ट सर्किट होताच याची माहिती म्हापसा अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र अग्निशमनचे पथक दाखल होण्यापूर्वीच बसमधील आग विझवण्याचं सामान वापरुन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे परिसरात काहीवेळ गोंधळ उडाला होता. आग लागताच तातडीने पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

SCROLL FOR NEXT