खांडेपारमध्ये पाण्याची पाईलपाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. सोमवारी सकाळी एका वाहनाने पाण्याची पाईपलाईन असलेल्या चेंबरला धडक दिल्याने पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यामुळे खांडेपार परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं.
पाईपलाईन फुटल्यामुळे रस्ता जलमय झाला होता. ओपा-खांडेपार तिस्क येथे पाईपलाईन फुटल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र उशिरापर्यंत पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली नव्हती. पाईपलाईनची दुरुस्ती होईपर्यंत पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. दरम्यान पाईपलाईन फुटल्यामुळे भलंमोठं कारंजं उडाल्याचं चित्र खांडेपार तिस्क परिसरात सकाळी दिसून आलं.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी बायथाखोल - कवळेच्या उंचवट्यावर असलेल्या जलवाहिनीचे चेंबर रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन कोसळला होता. बोरीहून फोंड्याला जाणाऱ्या प्रमुख रहदारीच्या रस्त्याशेजारी कवळे भागात गेल्या कित्येक वर्षांपासून येथून जाणाऱ्या जलवाहिनीचे चेंबर दगडांनी बांधून वर सिंमेट कॉक्रिटचा स्लॅब घालून हे चेंबर सुरक्षित ठेवले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.