Hit and Run Dainik Gomantak
गोवा

Hit and Run : कोलवाळमध्ये हिट अँड रन; बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

अपघातानंतर बससह पळ काढणार्‍या बसचालकास नंतर म्हापसा पोलिसांनी म्हापशातून ताब्यात घेत त्याला रितसर अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

मुंबई गोवा महामार्गावर आज बुधवारी सकाळी हिट अँड रनची घटना घडली आहे. कोलवाळ येथील चिखली जंक्शनवर राष्ट्रीय महामार्ग 66 वर रस्ता क्रॉसिंग करताना एका भरधाव प्रवासी बसने धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. लक्ष्मण फडते ( 66, रेवोडा) असे मयताचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हा अपघात बुधवार सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास झाला. मुंबई ते गोवा मार्गावर धावणार्‍या एका खासगी प्रवासी बसने पादचार्‍याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही बस ही मुंबईवरून प्रवाशांना घेऊन आली होती आणि ती म्हापशाच्या दिशेने जात होती. या अपघातानंतर बससह पळ काढणार्‍या बसचालकास नंतर म्हापसा पोलिसांनी म्हापशातून ताब्यात घेत त्याला रितसर अटक केली.

दुसरीकडे कोलवाळमधील अग्नितांडवही आज चर्चेचा विषय ठरलं. मुशीरवाडा-कोलवाळ परिसरातील बेकायदा भंगार अड्ड्यांना भीषण आग लागल्याने संपूर्ण चारही भंगार अड्डे जळून खाक झाले. एका भंगारअड्ड्यामध्ये कामगार वेल्डिंगचे काम करीत असताना त्याची ठिणगी पडून सदर आग लागल्याचे सांगितले जात आहे.

काही वेळात या आगीने रौद्ररुप धारण केले. अग्निशमन दलास याची माहिती मिळताच तातडीने गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. जवानांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र, या आगीची भीषणता इतकी तीव्र होती की परिसरात तसेच आकाशात आगीमुळे धुराचे लोट पाहायला मिळाले.

या आगीत एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्यास म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यास गोमेकॉत हलवण्यात आले. तो जवळपास 70 टक्के भाजल्याचे सूत्रांनी सांगितले. यासिन शेख (56) असं या जखमीचे नाव आहे. ही आगीची घटना बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली. या आगीवर दुपारपर्यंत नियंत्रण मिळवता आले नव्हते. आगीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात होता. या चारही भंगारअड्ड्यात निरुपयोगी टाकाऊ वस्तू होत्या. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टायर, ट्युब, खराब 100 एसीचे संच, बॅरल, फायबर, पुठ्ठे, रसायनं, वीजवाहिन्यांच्या तारा आदी सामान या आगीत जळून भस्मसात झाले.

या भंगारअड्ड्यांना लागूनच काही घरे आहेत. या आगीची झळ या घरांना पोहचू नये यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु होते. याशिवाय घरातील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले, जेणेकरुन कुठलीही अप्रिय घटना घडू नये. दुपारनंतर दोन जेसीबी बोलवण्यात आली. या जेसीबीच्या सहाय्याने भंगार अड्ड्यामधील सामान हे विखूरण्याचा प्रयत्न केला जात होता, जेणेकरुन ही आग आणखी पसरु नये. या भंगारअड्ड्यास लागून एक हेअर कटिंग सलून तसेच किराणाचे दुकान होते. त्यातील सामान सुद्धा हटविण्यात आले.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT