Goa Crime News |Goa News
Goa Crime News |Goa NewsDainik Gomantak

Goa Crime : फेक अकाऊंटवरुन अश्‍लील मेसेज पाठवणं पडलं महागात

अल्पवयीन मुलीच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल उघडून तिच्या आईला अश्‍लील मेसेज पाठविल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी अस्नोडा येथील एकाला अटक केली आहे.
Published on

अल्पवयीन मुलीच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल उघडून तिच्या आईला अश्‍लील मेसेज पाठवणं अस्नोड्यातील एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी सायबर कक्षाच्या पोलिसांनी अस्नोडा येथील आरोपी सिद्धार्थ कायसूवकर याला अटक केली. यासंदर्भातची तक्रार राजू यांनी दिली होती.

त्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशयिताचा शोध घेऊन त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला आला. आयटी कायद्याच्या कलम 66 सी आणि भादंसंच्या कलम 354 प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती या कक्षाच्या पोलिसांनी दिली. अज्ञात व्यक्ती आपल्या पत्नीला अश्‍लील मेसेज पाठवत असल्याची तक्रार राजू यांनी सायबर कक्षाकडे दाखल केली होती. तसेच त्या व्यक्तीने पाठविलेल्या मेसेजची माहिती कक्षाला त्या तक्रारीसोबत पाठवली होती.

Goa Crime News |Goa News
Colvale Fire : वेल्डिंगच्या ठिणगीमुळे अग्नितांडव; कोलवाळ परिसरात स्क्रॅपयार्डला आग

पोलिसांनी सायबर कक्षाकडे असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संशयिताचा शोध घेतला असता तो अस्नोड्यातच असल्याचे उघड झाले. त्याच्या मोबाईलच्या आयईएमआय क्रमांकापर्यंत पोहचल्यावर त्याच्या मोबाईलवर सर्वेलन्स ठेवून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रिमा नाईक करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com