Baga Boat Accident Dainik Gomantak
गोवा

Baga Beach Boat Accident : लाटेच्या तडाख्यात गोव्यात उलटली बोट! बागा येथील घटना; बेकायदेशीर जलसफारीमुळे तात्काळ कारवाई

Illegal water safari leads to boat overturn: बागा येथील समुद्रात गुरुवारी पर्यटक बोट जलसफरीसाठी निघाली असता, लाटांमुळे ही बोट पाण्यात बुडाली. या बोटीत १२ पुरुष-महिला पर्यटक होते. ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी तात्काळ धाव घेऊन पर्यटकांना समुद्रात बुडण्यापासून वाचविले.

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुट: बागा येथील समुद्रात गुरुवारी पर्यटक बोट जलसफरीसाठी निघाली असता, लाटांच्या जबरदस्त तडाख्यांमुळे ही बोट पाण्यात बुडाली. या बोटीत १२ पुरुष-महिला पर्यटक होते. ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी तात्काळ धाव घेऊन पर्यटकांना समुद्रात बुडण्यापासून वाचविले.

लाटेचा जोरदार तडाखा बसताच क्षणार्धात पाण्यात उलटलेल्या बोटीतून बाहेर काढेपर्यंत एक महिला तसेच एका पुरुषाला पोहता येत नसल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले.

परवाना, नोंदणीशिवाय वापरली बोट

पर्यटन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, राल्फ मास्कारेन्हास यांच्या मालकीची ही बोट नोंदणीशिवाय आणि पर्यटन खात्याकडील आवश्‍यक परवान्याशिवाय वापरली जात होती, ती जप्त केली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी, बेकायदेशीरपणे बोटीतून पर्यटकांना जलसफरीसाठी नेण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशारा या दुर्घटनेनंतर दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT