Talpona Canacona Coast Guard Police Patroling Boat
काणकोण: तळपण-काणकोण येथील तटरक्षक दल पोलिसांची बोट गेली तीन वर्षे नादुरुस्त अवस्थेत आहे. १.५० कोटी रुपयांची ही गस्तीची बोट दुरुस्त करणे शक्य नसल्याने ती तळपण जेटीवर भंगार अवस्थेत आहे.
तिच्या जागी हल्लीच कमी क्षमतेची नवीन बोट तटरक्षक दलाच्या दिमतीला देण्यात आली आहे. या तटरक्षक दलाकडे पोळे ते बेतुलपर्यत सागरी हालचालीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे.
हल्लीच तळपण नदीच्या मुखाशी एक मच्छीमारी बोट मच्छीमारासहित उलटली. मात्र ही तटरक्षक दलाची वादळी लाटांचा तडाखा सहन करीत घटनास्थळी पोहचू शकली नाही, त्यानंतर स्थानिक मच्छीमारांनी आपल्या बोटीच्या साह्याने समुद्रात गटांगळ्या खात असलेल्या मच्छीमारांना व बोट सुखरूप किनाऱ्यावर आणली.
तीन वर्षापूर्वी मालपे-कर्नाटक येथील हायस्पीड बोटीनी तळपण समुद्राच्या पांच नॉटिकल हद्दीत मासेमारी करण्यास सुरुवात केल्यानंतर स्थानिक मच्छीमारांनी पोलिसांना आपल्या बोटीवर घेऊन समुद्रात त्यांचा पाठलाग केला होता. तळपण नदीचे पात्र गाळमुक्त करण्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही, अशी माहिती मच्छीमारांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.