Goa Calangute Police Viral Video Dainik Gomantak
गोवा

Calangute Police: मद्यधुंद पर्यटकाला मारहाण भोवली; Video Viral झाल्याने पोलीस हवालदाराची नोकरी धोक्यात

Calangute Beach Crime News: दोन पर्यटक मद्यधुंद होऊन एकमेकांना मारहाण करत होते. कळंगुट पोलिसांनी हा प्रकार थांबविला. काही वेळाने हे पर्यटक पुन्हा मारहाण करत असल्याचे दिसल्यावर राग अनावर न झाल्याने एका पोलिस हवालदाराने पर्यटकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Police Constable Beating Tourist in Calangute

पणजी: कळंगुट येथे गुरुवारी मध्यरात्री एका पर्यटकाला लाथाबुक्क्यांनी पोलिस हवालदार मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची दखल घेत त्याची चौकशी उपअधीक्षक विश्‍वेश कर्पे यांच्यामार्फत करण्यात येत असल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

दोन पर्यटक मद्यधुंद होऊन एकमेकांना मारहाण करत होते. कळंगुट पोलिसांनी हा प्रकार थांबविला आणि पुन्हा मारहाण न करण्याची त्यांना ताकीद दिली. काही वेळाने हे पर्यटक पुन्हा मारहाण करत असल्याचे दिसल्यावर राग अनावर न झाल्याने एका पोलिस हवालदाराने पर्यटकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

‘त्या’ पर्यटकाकडून लेखी माफीनामा

विशेष म्हणजे, या प्रकरणातील पर्यटक किंवा अन्य कोणीही यासंदर्भात कोणत्याच पोलिस स्थानकात तक्रार दिलेली नाही. ज्या पर्यटकाला मारहाण झाली त्याने कळंगुट स्थानकात लेखी माफी दिली आहे. त्याने आपली चूक कबूल केली आहे. ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्याशी उर्मट वागल्याप्रकरणी त्या पर्यटकाने माफी मागितली आहे असे स्पष्टीकरण अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिले आहे.

...तर पोलिस निलंबित

पर्यटक मस्ती करत असल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. मात्र, कायदा हातात घेऊन त्यांना मारण्याचा अधिकार नाही. पोलिस हवालदाराने केलेली ही मारहाण हा गुन्हा आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गंभीर कारवाई होऊ शकते. याप्रकरणी तो सेवेतून निलंबितही होऊ शकतो, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 24 November 2024: केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस,कामाच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल; जाणून घ्या आजचे भविष्य

Goa Trip: तर आता कन्फर्म कराच!! डिसेंबर जवळ आलाय; गोव्याला फिरायला जायचं आहे ना?

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

SCROLL FOR NEXT