CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी दिली खुशखबर! नोकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचा विशेष कार्यक्रम

Unemployment In Goa: बऱ्याचदा शैक्षणिक पात्रता आणि रोजगार संधीतील गरज यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे आता उद्योग क्षेत्रानेच आपल्याला कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ हवे ते सांगून ते तयार करण्यासाठी मार्गदर्शन करावे, असा विचार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे आणला आहे.
CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod sawant Announces Partnership with Industries to Bridge Education-Employment Gap

पणजी: बऱ्याचदा शैक्षणिक पात्रता आणि रोजगार संधीतील गरज यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे आता उद्योग क्षेत्रानेच आपल्याला कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ हवे ते सांगून ते तयार करण्यासाठी मार्गदर्शन करावे, असा विचार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे आणला आहे. येत्या काही दिवसांत ही संकल्पना मूर्त स्वरूपात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी हे काम सध्या कामगार खात्याकडे सोपविले आहे. कामगार आयुक्त डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी उद्योगांच्या प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. उद्योग क्षेत्रातील व्यक्ती विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि त्यांना करिअर व शैक्षणिक पर्यायांबद्दल मार्गदर्शन करतील, अशी ही संकल्पना आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील अंतर कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना करिअरच्या संधींबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने एक विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

उद्योजक संघटनांशी सामंजस्य करार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि उद्योजकांच्या संघटना यांच्यात सामंजस्य करार केले आहेत. उद्योजक संघटनेचा अध्यक्ष हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सल्लागार मंडळाचा अध्यक्ष असतो. त्याही पुढे जात अन्य नोकऱ्यांसाठी काय शिकले पाहिजे याचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी तालुका आणि नंतर गाव पातळीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यातील आजवरची दरी कमी करण्यास मदत होईल.

मडगावात मार्गदर्शन केंद्र

मडगाव येथे लवकरच आदर्श करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती कामगार आयुक्त डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी दिली. राज्य सरकारने पणजीत आदर्श करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. रोजगार विनिमय केंद्राची संकल्पनाच बदलत सरकारने हे पाऊल टाकले आहे. तेथे विद्यार्थ्यांना सुरवातीला स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जात असे. आता या केंद्राच्या माध्यमातून रोजगार मेळावे भरविण्यात येऊ लागले आहेत.

करिअर निर्णयासाठी आत्मविश्‍वास

विद्यार्थ्यांना उद्योगातील तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरच्या निर्णयांमध्ये आत्मविश्वास येईल. या कार्यक्रमामुळे विद्यार्थी शाळा-कॉलेजमधील शिक्षणापलीकडे उद्योगाच्या गरजांसाठी तयार होण्याचा प्रयत्न करू शकतील, अशी ही संकल्पना आहे.

विद्यार्थ्यांच्या कौशल्याला चालना

उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि व्यावसायिक ज्ञानाचे अनुभव सामायिक करून त्यांना सध्याच्या आणि भविष्यकालीन संधींविषयी माहिती देतील. विद्यार्थी आवडीच्या क्षेत्रात कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, कोणती कौशल्ये महत्त्वाची आहेत, रोजगाराच्या संधी कशा आहेत, हे जाणून घेतील.

CM Pramod Sawant
Russian Dj Arrested: धक्कादायक! गोव्यात पहिल्यांदाच GHB Drugs जप्त, रशियन Dj महिलेला अटक

...अशी असेल संकल्पना

सध्या चर्चेच्या पातळीवर ही संकल्पना आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी प्रथम तालुका पातळीवर नंतर गाव पातळीवर जातील

हे प्रतिनिधी आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

विविध रोजगार संधी आणि त्यासाठी कोणते शिक्षण घेणे आवश्यक आहे, याचे मार्गदर्शन ते करणार आहेत.

कोणते शिक्षण घेतल्यावर रोजगार पक्का हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com