Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

‘त्या’ दुचाकीस्वारांविरोधात कारवाई बंद! पर्यटनमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक खातं अ‍ॅक्शनमोडमध्ये

Tourism Minister Rohan Khaunte: पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी लक्ष घातल्याने म्हापसा परिसरात ऑनलाईन पद्धतीने साहित्य पुरवठा करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधातील वाहतूक खात्याची कारवाई बंद झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी लक्ष घातल्याने म्हापसा परिसरात ऑनलाईन पद्धतीने साहित्य पुरवठा करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधातील वाहतूक खात्याची कारवाई बंद झाली आहे. म्हापशातील एका जागृत नागरिकाने हा प्रकार उघडकीस आणला होता.

तो नागरिक ज्येष्ठ नागरिक असल्याने सहसा घराबाहेर पडत नाही. तो ऑनलाईन खरेदी करतो. त्याला साहित्य मिळण्यास १० मिनिटे लागत असताना अचानकपणे अर्धा तास लागू लागला होता. त्याने हे साहित्य पुरवणाऱ्या दुचाकीस्वारांकडे विचारल्यावर वाहतूक खात्याने खासगी दुचाकींचा वापर साहित्य पुरवण्यासाठी होत असल्याचे कारण देत दंडात्मक कारवाई सुरू केली होती.

त्या नागरिकाने पर्यटनमंत्र्यांकडे कैफीयत मांडून पर्यटन व्यवसायाला याचा कसा फटका बसेल हे पटवून दिले होते. त्यानंतर खंवटे यांनी हा विषय वाहतूक संचालकांकडे उपस्थित केला. वाहतूक संचालकांनी यापुढे कारवाई केली जाणार नाही,अशी माहिती खंवटे यांना व्हॉटसॲपवर दिल्यावर ती माहिती खंवटे यांनी त्या नागरिकाला दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

SCROLL FOR NEXT