Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

Viral Video Woman Driver Escapes Oncoming Train: केरळच्या कन्नूर जिल्ह्यातून एक अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली, जिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Viral Video Woman Driver Escapes Oncoming Train
Viral VideoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Viral Video Woman Driver Escapes Oncoming Train: केरळच्या कन्नूर जिल्ह्यातून एक अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली, जिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कन्नूरच्या थाझे चोव्वा रेल्वे गेटवर रेल्वे फाटक बंद होत असताना एका महिला चालकाने घाईघाईत आपली गाडी रुळावरुन नेण्याचा प्रयत्न केला, मात्र याच नादात तिची काळ्या रंगाची महिंद्रा थार कार थेट रेल्वे रुळावरच अडकली. रेल्वे गेट खाली येत असताना काही महिलांनी ही घाई केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

गाडी अडकल्याचे लक्षात आल्यानंतर महिला चालकाने ती बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, गाडीचे टायर जोरात फिरु लागल्याने धुर निघू लागला, पण कार इंचभरही हल्ली नाही. तितक्यात दूरवरुन ट्रेन येण्याचा आवाज ऐकू येऊ लागला, ज्यामुळे क्षणात वातावरण अत्यंत भीतीदायक बनले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महिला चालकाने आणि कारमधील इतर प्रवाशांनी सेकंदभराचाही विलंब न लावता गाडीतून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पळ काढला, ज्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

Viral Video Woman Driver Escapes Oncoming Train
Viral Stunt Video: पठ्ठ्यानं 'नागराजा'सोबत घेतला पंगा, जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अरे भाई, हा जिवंत आहे की गेला'?

कार रुळावरच सोडून दिल्याने अवघ्या काही क्षणात तिथे पोहोचलेल्या ट्रेनला रेल्वे गेटजवळच तातडीने ब्रेक लावावा लागला. या दुर्घटनेमुळे रेल्वे वाहतूक तब्बल अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे विस्कळीत झाली, आणि नंतर पोलीस व रेल्वे कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने ती कार रुळावरुन बाजूला हटवली. 'एक्स'वर @TheERDoctor या हँडलवरुन शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अत्यंत संताप व्यक्त करत लिहिले की, नेहमी अशा गाड्या अडकण्यामागे हा अतिआत्मविश्वास का असतो? बंद होणाऱ्या बूम गेटच्या खालून गाडी काढण्याची ही घाई प्रवाशांच्या जिवावर बेतू शकली असती.

Viral Video Woman Driver Escapes Oncoming Train
Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

या घटनेनंतर सोशल मीडियावर (Social Media) युजर्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, रेल्वे क्रॉसिंगवरील या प्रकारच्या बेजबाबदारपणावर आणि लहानसहान घाईमुळे होणाऱ्या भयानक चुकांवर जोरदार चर्चा सुरु झाली. भारतात अशा अनेक रेल्वे फाटकांवर निष्काळजीपणामुळे दरवर्षी मोठे अपघात घडतात, जे कधीकधी जीवघेणी ठरतात. तज्ज्ञांच्या मते, रेल्वे गेट बंद होत असताना किंवा धोक्याची घंटा वाजत असताना कधीही रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करु नये, कारण ट्रेनचा वेग आणि अंतर याचा अंदाज लावणे अशक्य असते. या प्रकरणात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु एका चुकीच्या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांचा वेळ तर वाया गेलाच, शिवाय मोठी दुर्घटना होता होता वाचली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com