Goa Tourism: Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: किनारी पर्यटनाची वेगळ्या अर्थाने ओळख करून देणार पर्यटन मंत्री रोहन खंवटे

Goa Tourism: पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची माहिती

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: राज्यात जी-20 परिषदेच्या बैठका पार पडल्यानंतर जग कसे पुढे चालले आहे आणि गोव्याला कोणत्या दिशेने जायचे आहे, याचा विचार पुढे आला. त्यातूनच ‘ग्रीन टुरिझम’ विकसित करण्यावर भर देण्याचे निश्‍चित झाले. आत्तापर्यंत ओळख असलेल्या किनारी पर्यटनाची गोव्याची ओळख वेगळ्या अर्थाने करून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ‘एडीटर्स टेक'' या ‘गोमन्तक टीव्ही’वरील कार्यक्रमासाठी संपादक-संचालक राजू नायक यांनी मंत्री खंवटे यांची मुलाखत घेतली. ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने कितीही हरित पर्यटन म्हणून चालत नाहीत, तर ते सर्वजणांनी अंमलात आणायला हवे.

पंचतारांकित काही हॉटेल्सनी हरित पर्यटनाची अंमलबजावणी केली आहे, त्यात त्यांनी प्लास्टिक बाटली, टूथ ब्रश सारख्या वस्तू वापरणे बंद केले आहे. त्याठिकाणी आता तुम्हा बाबूंचा ब्रश, बांबूचे कंगवे नजरेस पडतील. ताज सारख्या हॉटेलनीही ही पद्धत अवलंबली आहे. केवळ पंचतारांकित हॉटेलनेच ग्रीन टुरिझमची कल्पना राबवायला सुरुवात केली आहे. पुढील पिढीसाठी कार्बनमुक्त वातावरण असावे, असा यामागील उद्देश आहे.

पर्यावरण राखून पर्यटन करू शकलो, तरच पुढच्या पिढीला लाभ होईल, असे सांगत खंवटे म्हणाले, स्वयंपोषक विकास साधत असताना त्याच्याशी निगडित घटकांनाही त्याची जबाबदारी पेलणे गरजेचे आहे.

अधिक खर्च करणारे आणि उच्च दर्जाचे पर्यटक गोव्यात आणण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचेही खंवटे यांनी नमूद केले. पर्यटन खात्याच्या काही धोरणाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींवरही खंवटे यांनी टीका केली. काही लोक अशा विरोधात राजकारण करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आखाती देशात थेट विमानसेवेसाठी प्रयत्न !

आम्ही पायाभूत सुविधा निर्माण करताना पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करतो,असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. जागतिक स्तरावर गोव्यातील पर्यटनाची ओळख निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागातील पर्यटनावर भर दिला आहे. त्याठिकाणी निर्माण होणाऱ्या सुविधा पाहता तेथे मर्यादित पर्यटक येतील, हेही पाहिले जाईल. त्यासाठी आखाती देशातून पर्यटक गोव्यात आणण्यासाठी थेट विमानसेवा सुरू करण्याकरिता आम्ही नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे त्याविषयी चर्चाही केली आहे,असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT