Toordal Wasted by Goa Government Dainik Gomantak
गोवा

Toordal Fraud in Goa : लिलावातून साखरेसह तुरीला कवडीमोल भाव

कोरोना काळात राज्यातील जनतेला देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेली तूरडाळ आणि साखरेचा साठा पडून राहिल्याने खराब झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Toordal Fraud in Goa : कोरोना काळात राज्यातील जनतेला देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेली तूरडाळ आणि साखरेचा साठा पडून राहिल्याने खराब झाला. नागरी पुरवठा खात्याने या दोन्ही वस्तूंचा लिलाव करताना चांगली तूरडाळ व साखर बाजूला काढली नाही. त्यामुळे दोन्ही वस्तू कवडीमोल दराने निविदाधारकांनी खरेदी केल्याचे पुढे आले आहे.

राज्य सरकारने कोरोना काळात 242 टन तूरडाळ, तर साखरेचा दहा हजार किलोचा साठा खरेदी केला होता. त्यावेळीच्या तुरडाळीच्या दरानुसार ही रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये जाते. तर साखरेसाठी राज्य सरकारने आपल्या तिजोरीतून 2 लाख 60 हजार खर्च केले होते. कोट्यवधी रुपयांच्या या दोन्ही वस्तू गोदामात पडून राहिल्याने नागरी पुरवठा खात्याने त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा काढली.

तुरडाळीसाठी हरियाणा आणि कर्नाटकातून एकूण चार निविदाधारकांनी निविदा भरली. त्यात हरियाणातील सर्वाती फुड्सने 242 टन तुरडाळ 18 लाख 43 हजार रुपयांना खरेदी केली. त्यामुळे या फुड्स कंपनीला तुरडाळ प्रति किलो 7 रुपये 61 पैसे या दराने पडली. तर साखरेचाही दहा हजार किलोचा साठा खरेदी करण्यासाठी कोल्हापूरच्या दोन कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. त्यात देसाई कटरली एजन्सीची निविदा सरकारने स्वीकारली. ही साखर सरकारने 1.62 लाख रुपये दराने खरेदी केली. म्हणजेच साखरेला प्रति किलो दर 16.20 रुपये असा मिळाला. दरम्यान, धान्य नुकसानप्रकरणी नागरी पुरवठा खात्याचे तत्कालीन संचालक सिद्धीविनायक नाईक यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सध्या दक्षता आयोग करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

बिहारचा बाहुबली ते दिल्लीचा दरबारी; नितीन नवीन यांच्या संघटनात्मक कौशल्याची आता राष्ट्रीय कसोटी- संपादकीय

Shashi Tharoor Viral Tweet: "न्यूझीलंडच्या धावांपेक्षा अधिक मी सेल्फी दिल्या'' नागपूरच्या मैदानावर शशी थरुर यांची फटकेबाजी; व्हायरल ट्विटनं जिंकली चाहत्यांची मनं

Viral Video: रीलचा नाद बेतला जीवावर! हायवेवर स्टंट करताना बाईक डिव्हायडरला धडकली, तिघं तोंडावर आपटले; थरार कॅमेऱ्यात कैद

Bicholim: सणासुदीच्या हंगामात विड्याच्या पानांना आलाय भाव! विड्याच्या पानांचे दर दुप्पट; हळदी-कुंकू उत्सवामुळे मागणीत वाढ

SCROLL FOR NEXT