Chikungunya Spread in Goa : गोव्यात चिकुनगुनियाच्या रुग्णांत मोठी वाढ

सतर्कतेची गरज; यंदा सप्टेंबरपर्यंत बाधितांची संख्या 100 वर
Chikungunya Spread in Goa
Chikungunya Spread in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Chikungunya Spread in Goa राज्यात यंदा मच्छरांमुळे होणाऱ्या चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने चिंतेत भर पडली आहे. गत वर्षीच्या तुलनेत ही संख्या प्रचंड मोठी आहे. 2021 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान 8 रुग्ण आढळले होते. मात्र, यावर्षी सप्टेंबरपर्यंत ही संख्या 100 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य सेवा संचालयानालयाने दिली आहे.

गत सप्टेंबरमध्ये 29 जणांना चिकुनगुनियाचा आजार झाल्याची माहिती आहे. याचा संसर्ग हा दक्षिण गोव्यात पसरला असून मडगाव, कुडतरी, नावेली या परिसरात रुग्ण आढळले आहेत. 20 कलमी कार्यक्रम राबविलेल्या लोकवस्तीच्या ठिकाणी रुग्ण जास्त संख्येत आढळत आहे. याचा स्रोत हा कर्नाटकातून आलेल्या स्थलांतरित मजुरांमध्ये सापडला आहे. लोकवस्तीत येऊन हे मजूर राहिलेल्याने हा आजार पसरला आहे.

राष्ट्रीय संसर्गजन्य आजार उपक्रमाच्या (एनआयएआयडी) मुख्य अधिकारी डॉ. कल्पना माहात्मे यांनी सांगितले, की 2019 मध्ये चिकुनगुनियाचा शेवटचा संसर्ग झाला होता. तेव्हा काणकोण तालुका प्राभावित झाला होता. परंतु तालुक्यातील पालिका आणि पंचायतींनी चिकुनगुनियाचे स्रोत ओळखून स्वच्छता राखून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. त्यानंतर 2020 आणि 2021 या दोन वर्षांत कोरोनामुळे स्थलांतरित मजूर जास्त संख्येत गोव्यात आले नाहीत. मात्र, यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने पुन्हा एकदा कर्नाटकातील मजुरांचे आगमन झाल्याने रुग्ण वाढले आहे.

Chikungunya Spread in Goa
Goa Industries : गोवा तेलंगणापेक्षा एक पाऊल पुढे टाकणार का?

चिकुनगुनिया आजार पसरणाऱ्या डासांची उत्पती हे साचलेल्या पाण्यातून होते. त्यासाठी पाच एमएल पाणी सुद्धा पुरेसे आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवून सुखा कचरा राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांधे सूज येणे किंवा पुरळ येणे आणि सांधे दुखी. चिकुनगुनियामुळे मृत्यू होण्याची शक्यता किरकोळ आहे, परंतु सांधेदुखी किमान चार ते पाच महिन्यापर्यंत होऊ शकते.

शेजारच्या कर्नाटकामध्ये चिकुनगुनियाचा संसर्ग असून तेथून आलेल्या मजुरांनी हा गोव्यात आणला आहे. तरी देखील आता पुन्हा एकदा आम्ही हा नियंत्रणात आणला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रुग्ण जास्त आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती डॉ. कल्पना माहात्मे यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com