Tomato  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात टोमॅटोचे दर अजूनही वधारलेलेच

घाऊक बाजारात टोमॅटो 100 रुपये प्रती किलो

दैनिक गोमन्तक

पणजी : टोमॅटोच्या दराने ग्राहकांच्या उरात धडकी भरत आहे. गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोने गाठलेली दराची शंभरी अजूनही तशीच आहे. वाढलेल्या टोमॅटो दराने अनेकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. (Tomato rates are soaring in Goa)

अवकाळी पडलेल्या पावसामुळे तसेच उत्पन्न घटल्याने टोमॅटोचा बाजारात तुटवडा जाणवू लागला परिणामी दरात वाढ झाली. आठवडाभरापूर्वी 30 रुपये किलो रुपये दराने मिळणारे टॉमेटो आता 100 रुपयांनी मिळू लागला आहे. तर फलोत्पादन महामंडळाच्या पणजी येथील गाळ्यात 45 रूपये प्रती किलो दराने टोमॅटो उपलब्ध आहेत. कांदा व बाटाट्याचे दर मात्र स्थिर आहेत. गवार बिन्स, शिमला मिरची यांचे दर चढेच आहेत.

पिकलेले गरे 100 रुपयांना वाटा

रानमेव्यानंतर आता पिकलेले पिवळेबुंद खमंग गरे पणजी बाजारात उपलब्ध झाले आहेत. 100 रुपये प्रती वाटा दराने विकले जात असून अनेक शौकीन ते आवर्जून घेत आहेत. रानमेव्यातील जांभळे आणि करवंदे अजूनही बाजारात उपलब्ध आहेत. अनेक रानमेवाप्रेमी ते विकत घेताना दिसतात. मानकुराद आंब्याची आवक कमी झाल्याने 500 रुपये प्रती डझन दराने विकला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: नागेशीत 'गोविंदा रे गोपाळा'च्या गजरात दही हंडी साजरी

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT