''सरकारने नोकरीसाठी कोकणी सक्तीची करावी''

भूमिगत वाहिन्यांसाठी मास्टर प्लॅन हवा
vijay sardesai
vijay sardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: जमिनीखाली कोणत्या वाहिन्या आहेत, त्यांची व्यवस्था कशी आहे, याचा मास्टर प्लॅन सरकारने तयार करावा. मास्टर प्लॅन तयार असल्यास कुठली वाहिनी कुठे आहे, याचा अंदाज घेणे शक्य होईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जलवाहिनी असावी. हे सर्व प्रश्न विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार आहे, अशी माहिती फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. (Government must make Konkani compulsory for jobs: MLA Vijay Sardesai )

आज मडगावात पत्रकारांशी संवाद साधताना सरदेसाई म्हणाले, कोकणी ही भाषा आहे, बोली नाही हे स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. कोकणीमुळेच गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे नोकरीसाठी कोकणी भाषा सक्तीची करणे गरजेचे आहे. सरकारने प्रत्येक कामाला आणि खर्चाला प्राधान्यक्रम देताना लोकांच्या हिताचे काम तसेच त्यांना मिळणारे अनुदान, आर्थिक साहाय्य याला प्राधान्य द्यावे. राजभवनसाठी खरोखरच इमारतीची गरज आहे काय ? आर्थिक साहाय्याच्या योजनांचे पैसे ज्येष्ठ नागरिकांच्या बॅंक खात्यात जमा करावे का, या निर्णय सरकारने घ्यायचा आहे, असेही सरदेसाई यावेळी म्हणाले.

राजभवनच्या नव्या इमारतीत मंत्र्यांची बडदास्त

दोनापावल येथील राजभवन परिसरात आणखी एक इमारत बांधण्याचा सरकारचा विचार आहे. यासंबंधी ते म्हणाले, राजभवन परिसरात जी 40 कोटी रुपये खर्च करून दुसरी इमारत बांधण्यात येईल, तेथे राज्यपाल राहणार नाहीत. ही इमारत दिल्लीहून येणारे मंत्री, खासदार, सरकारी अधिकारी यांच्यासाठी असेल.

vijay sardesai
नदी परिवहन खात्यामध्ये शिस्त आवश्यक - मंत्री फळदेसाई

गोव्यात सागर मित्र भरतीसाठी कोकणी सक्तीची करा असे विजय सरदेसाई यांनी म्हटले होते

गोव्याच्या मत्स्योद्योग खात्याने 'सागर मित्र' यासाठी जी 24 पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी कोकणी भाषा सक्तीची केली नसल्याने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी तीव्र नापसंती व्यक्त करताना ही पदे भरण्यासाठी कोकणीचे ज्ञान सक्तीचे करा अशी मागणी 13 मे रोजी केली होती. या 24 जागा भरण्यासाठी सरकारने जी जाहिरात दिली आहे त्यात कोकणीचा स्पष्ट उल्लेख न करता स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यकअसे म्हटले असून उमेदवार स्थानिक असल्यास चांगले असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com