toll plaza
toll plaza  Dainik Gomantak
गोवा

मुंबई-गोवा महामार्गावरील दोन टोलनाक्यांवर उद्यापासून टोलवसुली

दैनिक गोमन्तक

मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कोकणातील दोन टोल नाक्यावर टोल वसुलीची तारीख निश्चित केली आहे. यामूळे कणकवलीमधील ओसरगाव टोल नाक्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधल्या हातीवलेमध्येही 1 जून पासून टोल वसुली सुरु होणार आहे. यामूळे गोवा - मुंबई महामार्गावर प्रवास करणारे प्रवासी आणि पर्यटक यांना यांचा फटका बसणार आहे. यामूळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. कारण टोल वसुलीच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ( Toll collection on two toll plazas on Mumbai-Goa highway from tomorrow)

सिंधुदुर्गवासियांकडून टोल वसुली केल्यास टोलनाका उद्ध्वस्त करुन टाकू, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मनसेने सिंधुदुर्गातील वाहनांकडून जबरदस्तीने टोल वसुली केल्यास टोलनाक्याची तोडफोड करणार असं म्हटलं आहे. तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लोकांची नुकसान भरपाई द्या, महामार्गावरील समस्या सोडवा आणि मगच टोल वसुली करा अशी सावध भूमिका घेतली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या 60 किमी लांबी करता एम डी करीमुन्नीसा या टोल ठेकेदार कंपनीमार्फत उद्यापासून टोलवसुली सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी देखील सुरु आहे. ओसरगाव नाक्यापासून 20 किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक 315 रुपयांचा पास देण्यात येणार आहे. तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे. दुचाकी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT