Ro-Ro Ferry In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ 14 जुलैला; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Today's Marathi Breaking News 10 July 2025: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी मराठीमध्ये.

गोमंतक ऑनलाईन टीम

रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ सोमवारी

गोव्यात रो-रो फेरीबोटी सेवेचा शुभारंभ तीन दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. ११ जुलै रोजी हा कार्यक्रम आता काही तांत्रीक कारणांमुळे सोमवारी १४ जुलै रोजी होणार आहे. खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी दिलेल्या माहितीला मंत्री सुभाष फळदेसाईंकडूनही दुजोरा.

बेतोडा अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे आली समोर

बेतोडा जंक्शनवर झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात मरण पावलेल्या दोघांची नावे आली समोर. आदित्य देसाई (बेतोडा, फोंडा) आणि इशा गावस (केरी,सत्तरी) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू. अदिती उमेश मांजरेकर (पर्ये,सत्तरी) ही दुसरी युवतीही जखमी. आणखीन एक गंभीर जखमी युवकाला जीएमसीत उपचारांसाठी पाठविण्याची शक्यता. त्याचे नाव अजून कळालेले नाही.

गंभीर जखमी झालेल्या युवकाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु

बेतोडा येथील अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु. गंभीर जखमीला गोमेकोत पाठविण्यात आले आहे.

बेतोडा येथे दोन दुचाकींचा अपघात,दोघांना मरण

बेतोडा येथील धोकादायक जंक्शनवर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोघांना मरण‌‌. मृतांत एक युवक व एका युवतीचा समावेश.

"मेल परेड इन अंडरवेअर" वृत्ताची गोवा मानवाधिकार आयोगाकडून दखल

१० जुलै रोजी संस्कृती महोत्सवात "मेल परेड इन अंडरवेअर" या वृत्तपत्रात आलेल्या वृत्ताची गोवा मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. योगाने गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंना २३ जुलैपर्यंत या घटनेचा सविस्तर अहवाल किंवा उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हडफडे सरपंच रोशन रेडकर यांनी राजीनामा घेतला मागे

संपूर्ण पंचायत समितीने घेतलेल्या निर्णयानंतर हडफडे सरपंच रोशन रेडकर यांनी राजीनामा मागे घेतला आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळातील तीन वर्षे पूर्ण करणारे रेडकर आता उर्वरित दोन वर्षे सरपंच म्हणून काम पाहतील.

खांडेपार पूलच्या दोन्ही बाजूनी असलेले अंडरपास बनला दुचाकी पार्किंग स्पॉट

खांडेपार पूलच्या दोन्ही बाजूनी असलेले अंडरपास सध्या दुचाकी पार्किंग स्पॉट बनला आहे. त्यामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम होत आहे. सकाळी विविध ठिकाणी जाणारे कामगार अंडरपास जवळ दुचाक्या पार्क करून संध्याकाळी वाहने घेऊन जातात. दोन्ही अंडरपास जवळ वारंवार अपघात होतात. भविष्यात अपघात रोखण्यासाठी अंदासपास जवळ दुचाक्या पार्क करणाऱ्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी.

गोव्यात पुन्हा यलो अलर्ट!

भारतीय हवामान खात्याने १३ जुलै ते १६ जुलै २०२५ दरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे.

श्री हरीहरानंद भारती स्वामीजींच्या चातुर्मास व्रत साधनेला गिमोणे-पिळगाव येथे सुरवात

चातुर्मास व्रत साधना. बिड-महाराष्ट्र येथील श्री हरीहरानंद भारती स्वामीजींच्या चातुर्मास व्रत साधनेला गिमोणे-पिळगाव येथे सुरवात. भाजपचे अध्यक्ष दामू नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पाद्यपूजा करून संकल्पाचा केला शुभारंभ

कणकवलीहून येणारे भरलेले वाहन विजेच्या खांबावर आदळले

कणकवलीहून येणारे भरलेले वाहन विजेच्या खांबावर आदळले. वाहतूक ठप्प; परवानगीसाठी वीज विभाग आणि क्रेन सेवा मागवण्यात आल्या.

कला राखन मांड यांचे "सुपारी आंदोलन"

मुख्य सभागृह बंद पडणे, कला वर्गांची अनुपलब्धता आणि इतर समस्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी कला राखन मांड यांचे "सुपारी आंदोलन" आज, गुरुवार १० जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता मडगाव येथील रवींद्र भवन येथे होणार आहे.

चेक बाऊन्स प्रकरणी वल्लभ वरक याला अटक

दवर्ली येथील व्यावसायिक वल्लभ वरक याला चेक बाऊन्स प्रकरणी आज डिचोली पोलिसांनी अटक केली. डिचोली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार वरक याच्या विरोधात डिचोली न्यायालयात चेक बाऊन्स प्रकरण प्रलंबित असून त्या सुनावणीस गैरहजर राहिल्याने वरक याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली असून उद्या त्याला न्यायालयात पेश करण्यात येणार असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT