राखणदाराची सीमा हटवण्याचा अधिकार कुणालाच नाही. खाप्रेश्वर मंदिराबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मी निषेध करतो. खाप्रेश्वर मंदिर जिथे होते तिथेच उभे राहायला हवे. लोकांनी याबाबात आवाज उठवायला हवा, अशी प्रतिक्रिया गोवा कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.
कोकण रेल्वे पोलिसांनी 514.5 किलो संशयित गोमांस जप्त केले, ज्याची बाजारभावानुसार किंमत 1,54,350 असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीला गोवा प्राणी संरक्षण कायदा आणि रेल्वे कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली.
आजपासून (9 मार्च) पुढील तीन दिवस राज्यातील वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 11 मार्चपर्यंत उष्णतेचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
मोरजी शापोरा नदीत शिवोली येथील बेकायदपणे होडीद्वारे शीनाने काढण्यास स्थानिकांचा विरोध ,त्यापेक्षा स्थानिक जसे बुडून काढतात तसे शीनाने काढा अशी मागणी.
'शिरोडा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे उरलाय. इथे पाण्याचीही बिकट समस्या आहे.युवकांसाठी खेळाच्या साधनसुविधांचाही अभाव'. कार्यालय आणि लोकांसाठी मोफत रुग्णवाहिकेच्या अनावरण प्रसंगी समाजसेवक शिवप्रसाद शिरोडकरांचे प्रतिपादन.
"आमचा विरोध विकासाला नाही, मात्र स्थानिकांच्या आस्थेचा सुद्धा तेवढाच विचार केला गेलं पाहिजे" असं माणिकराव म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे देखील उपस्थित होते.
गोव्यात आतापर्यंत ३२०० स्वयंसहाय्य गट असून त्यात ४२ हजार महिला जुळलेल्या आहेत. त्यांचे विविध माध्यमातून आर्थिक व्यवहाराची उलाढाल ३३२ कोटी रू. आहे. भविष्यात हि उलाढाल ६०० कोटीपर्यंत व स्वयं सहाय्य गटांमध्ये महिलांची संख्या १ लाखांवर नेण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी महिलांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात आयोजित महिला दिन सोहळ्यात केले.
सभापती रमेश तवडकर, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्यासह श्रम धाम योजनेअंतर्गत घरे बांधण्यासाठी ययनद केरळ आपत्ती स्थळाला भेट देण्यासाठी जात आहेत.
मांद्रे नववर्ष स्वागत समितीच्या बैठकीत रविवार दिनांक ३० मार्च रोजी मोठ्या उत्साहात ग्रामदेवता श्री भगवती देवी मंदिराच्या प्रांगणात सार्वजनिक गुढीपूजन उत्सव आणि दुचाकी फेरीच्या आयोजनाचा निर्णय. झालेल्या बैठकीत हजारोंच्या संख्येत लोकांची उपस्थिती करण्याचा आयोजकांचा निर्धार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.