Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

लोबोंचा 48 तासांचा अल्टिमेटम भाजपच्या इशाऱ्यानंतर मागे

सामूहिक जबाबदारी असल्याने एक मंत्री आपल्याच सरकारला 48 तासांची मुदत देऊ शकत नाही, घाबरलेल्या मंत्र्यांचा अनोखा ‘यू - टर्न’

दैनिक गोमन्तक

कळंगुट: जुने गोवे (Old goa) येथील पुरातन वारसा स्थळ परिसरातील निर्माणाधीन बांधकामाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी (CM Prmaod Sawant) 48 तासांत बांधकाम बंद करावे, अन्यथा चार लाख लोकांचा महामोर्चा काढण्यात येईल, असा अल्टिमेटम घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो (michael lobo) यांनी दिला होता. भाजपच्या (BJP) इशाऱ्यानंतर घाबरलेल्या लोबोंनी काही तासांतच हा निर्णय मागे घेतला. सामूहिक जबाबदारी असल्याने एक मंत्री आपल्याच सरकारला 48 तासांची मुदत देऊ शकत नाही, असे त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. त्यामुळेच लोबोंनी घुमजाव केला. उल्लेखनीय म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda)यांच्या उपस्थितीत हे घडले आहे.

भाजपच्या संघटनात्मक पातळीवर मायकल लोबो यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाणार होती. लोबो हे सरकारवर सतत आरोपांच्या फैरी झाडत आहे. त्यामुळे भाजप त्यांच्यावर नाराज आहे. बार्देशात हडफडे येथील पुरातन कपेलच्या सुशोभीकरण कार्यक्रमात बुधवारी रात्री त्यांनी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली होती. जुने गोवे येथील वारसा स्थळ हे केवळ एकाच धर्माचे श्रद्धास्थान नाही. देश - विदेशातील विविध धर्मांतील कोट्यवधी लोकांचे ते श्रद्धास्थान आहे. त्यामुळे ‘नो डेव्हलपमेंट झोन’ असलेल्या येथील जागेत बांधकाम उभारण्यासाठी परवाना दिलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले. पूर्वजांकडून आपल्याला मिळालेला वारसा आणि त्याचे रक्षण करण्यासाठी गोमंतकीय जनतेने एकजुटीने या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन मंत्री मायकल लोबो यांनी यावेळी केले.

म्हणे, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

जुने गोवेतील वारसा स्थळ प्रश्नावरून मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून कुणाच्याही दबावाखाली न येता वारसा स्थळाचे रक्षण करण्याची मागणी करणार असल्याचे लोबो म्हणाले. विद्यमान सरकारकडून हा विषय गांभीर्याने न घेतल्यास मार्चमध्ये नवीन सरकार स्थापन होताच हा विषय प्रामुख्याने हाताळला जाईल. त्यामुळे या वादग्रस्त बांधकामावर निश्चितच हातोडा पडणार आहे. सध्या या प्रकरणावरून आंदोलन अथवा मोर्चा काढण्याची आवश्यकता नसून तमाम गोमंतकीयांच्या नजरा सध्या मुख्यमंत्री सावंत यांच्या भूमिकेकडे लागल्या असल्याचे लोबो यांनी हडफडेतील चौरंगीनाथ देवस्थानच्या परिसरात गुरुवारी बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन केल्यानंतर सांगितले.

जुने गोवे येथील वारसा स्थळाच्या प्रश्नावरून आज मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहे.

- मायकल लोबो, मंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: कुडचडे फसवणूक प्रकरणात बँक मॅनेजरला अटक

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

Indian Navy Goa: भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा आणि मच्छीमार नौकेचा अपघात कसा झाला? महत्वाची माहिती समोर, दोघेजण अद्याप बेपत्ताच

SCROLL FOR NEXT