55th IFFI Goa : 77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Pune to host Army Day celebrations highlights showcased at IFFI: भारतीय लष्कराने इफ्फीत या आगामी संचालनासाठी प्रमोशनल व्हिडिओचे अनावरण केले. याला सिनेफिल्स, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि उद्योग जगतातील नेत्यांकडून उत्साही प्रतिसाद मिळाला.
77th Army Day Parade
77th Army Day ParadeDainik Gomantak
Published on
Updated on

77th Army Day Parade At Pune Promo Screening

पणजी: पुणे हे आपल्या समृद्ध लष्करी वारशासाठी प्रसिद्ध असलेले शहर. १५ जानेवारी २०२५ रोजी प्रथमच प्रतिष्ठित लष्कर दिन संचलनाचे यजमानपद सांभाळण्यास सज्ज झाले आहे. पुण्याच्या लष्करी इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.

भारतीय लष्कराने इफ्फीत या आगामी संचालनासाठी प्रमोशनल व्हिडिओचे अनावरण केले. याला सिनेफिल्स, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि उद्योग जगतातील नेत्यांकडून उत्साही प्रतिसाद मिळाला.

77th Army Day Parade
IFFI 2024: 'पौराणिक कथा मिथक नाहीत, ती तर आपली संस्कृती'; ‘महावतार नरसिंह’च्या दिग्दर्शकाने जागवला परंपरांचा अभिमान

भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांची १९४९ मध्ये झालेली नियुक्ती, जे भारताच्या स्वातंत्र्योत्तर लष्करी नेतृत्वाचे प्रतीक आहे, याच्या स्मरणार्थ हे लष्कर दिन संचलन आयोजित केले जाते. पारंपरिकरीत्या दिल्लीमध्ये होणारे हे संचलन २०२३ पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरण्यास आरंभ झाला.

गोवा

सुरुवात बेंगळुरूपासून झाली. त्यानंतर २०२४ मध्ये लखनौमध्ये आयोजन झाले. आता २०२५ च्या संचलनासाठी झालेली पुण्याची निवड झाली आहे. या शहराचे सशस्त्र दलांशी असलेले ऐतिहासिक संबंध आणि भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालय म्हणून असलेली भूमिका अधोरेखित करते.

77th Army Day Parade
Kriti Sanon In IFFI: 'चित्रपटात महिलांचे खरे रूप दाखवणे...'; अभिनेत्री क्रिती सेनॉनने पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल मांडले मत

या वर्षीचे संचलन बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप आणि सेंटर येथे होणार आहे, ज्यामध्ये मार्चिंग दल, यांत्रिक स्तंभ आणि तांत्रिक प्रदर्शने असतील. ड्रोन आणि रोबोटिक्स सारख्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांसह, लढाऊ प्रात्यक्षिके आणि मार्शल आर्ट्स डिस्प्ले यासारख्या आकर्षक कामगिरीचा समावेश यावर यात भर असेल.

‘तुमच्या सैन्याला जाणून घ्या’ प्रदर्शन

संचलनाच्या आधी, जानेवारीच्या सुरुवातीला पुणे येथे आयोजित ‘तुमच्या सैन्याला जाणून घ्या’ या प्रदर्शनासारख्या कार्यक्रमांमुळे नागरिकांना प्रगत शस्‍त्रांचे अवलोकन करता येईल आणि देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी संवाद साधता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com