Indian Navy Goa: भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा आणि मच्छीमार नौकेचा अपघात कसा झाला? महत्वाची माहिती समोर, दोघेजण अद्याप बेपत्ताच

Navy Submarine Accident with fishing Boat: गोव्यालगतच्या समुद्रात करंज या नौदलाच्या पाणबुडीची धडक मच्छीमार नौकेला बसल्याने ती बुडाल्याचा दावा नौकेच्या मालकाने केला आहे. याआधी पाणबुडीला नौका धडकल्याचे सांगण्यात येत होते.
Submarine Accident with fishing boat
Submarine Canva
Published on
Updated on

Indian Navy Submarine Accident with fishing boat off goa

पणजी: गोव्यालगतच्या समुद्रात करंज या नौदलाच्या पाणबुडीची धडक मच्छीमार नौकेला बसल्याने ती बुडाल्याचा दावा नौकेच्या मालकाने केला आहे. याआधी पाणबुडीला नौका धडकल्याचे सांगण्यात येत होते. नौदलाने या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरु केली आहे.या ‘मार्थोमा’ नावाच्या मच्छीमार नौकेचे मालक केरळमधील आहेत.

गोव्याजवळील समुद्रात मुनंबमहून निघालेल्या मासेमारी बोटीला २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता अपघात झाला. अपघाताचे कारण पाण्याखालून अचानक पृष्ठभागावर आलेली नेव्हल पाणबुडी असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. नौकेचे मालक लिजू मायकल यांची व मच्छीमार नौकेवरील कामगारांची जबानी नौदलाच्या कारवार येथील अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतली आहे. यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेल्या माहितीत लिजू यांनी पाणबुडी पाण्यातून अचानकपणे वर आल्याने नांगर टाकून मासेमारी करणारी ‘मार्थोमा’ ही नौका बुडाल्याचा दावा केला.

त्यांनी सांगितले, की नौकेवरील वाचलेल्या मच्छीमार कामगारांनी याची माहिती दिली आहे. नौका गोव्यापासून १७ सागरी मैलावर असताना पाणबुडी अचानकपणे वर आली आणि मच्छीमारी नौका क्षणार्धात बुडाली. पाणबुडी नौकेखाली उगम पावल्याने ती उलटली आणि समुद्रात बुडाली.

नौका मासेमारीसाठी मुनंबमहून १५ नोव्हेंबर रोजी निघाली होती. अपघातावेळी १३ मच्छीमार नौकेवर बसून मासेमारी करत होते. त्यांनी दिलेल्या जबानीनुसार त्यांना सुरवातीला नौकेला मोठ्या व्हेलने धडक दिली असे वाटले. पाणबुडीच्या धडकेत ११ मच्छीमार कामगार समुद्रात पडले. सिरांग जनीश (कोट्टिपाडू, तामिळनाडू) आणि रमेश (पश्चिम बंगाल) हे दोन मच्छीमार कामगार अद्याप बेपत्ता आहेत. वाचलेले सर्व मच्छीमार कामगार स्थलांतरित कामगार असून गेल्या काही वर्षांपासून या नौकेवर काम करत होते, असे लिजू यांचे म्हणणे आहे. केरळ राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारीही गोव्यात पोहोचले आहेत.

Submarine Accident with fishing boat
Goa Cyber Crime: धक्कादायक! ‘सायबर’ठगांकडून गोमंतकीयांना 9 कोटींचा गंडा; 53 गुन्ह्यांची नोंद

तीन कोटींचे नुकसान

या अपघातात नौका, जाळी व तत्सम साहित्य मिळून मालकाचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाच वर्षांपूर्वी नौका १ कोटी ६५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली होती. अपघाताच्या वेळी गोवा, गुजरात आणि केरळच्या ५० पेक्षा जास्त मासेमारी नौका आजूबाजूला होत्या. मात्र, गडद अंधारामुळे कोणालाही नेमके काय घडले ते कळले नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com