Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa News: निराधार महिलेला मंत्री राणे स्वखर्चाने बांधून देणार नवीन घर; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Today's Marathi Breaking News: गोव्यातील राजकारण, मनोरंजन, वातावरण, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

सरकारची वाट न पाहता स्वखर्चाने घरे उभारली आहेत!

सरकारची वाट न पाहता सत्तरीत आम्ही शंभरावर गरजूंची घरे उभारुन दिली आहेत. गरजूंना तात्काळ घर उपलब्ध होण्याकडे माझा नेहमी कटाक्ष असतो. आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचे प्रतिपादन.मलपण येथे निराधार महिलेचे घर स्वखर्चाने बांधून देण्याची मंत्री राणेंची घोषणा.

जळलेल्या टॅंकरमध्ये खचाखच बनावट दारु, तरी अबकारी खात्याचा एकही अधिकारी नाही?

धारगळ महाखाजन येथे मंगळवारी सकाळी आग लागलेल्या टॅंकरमध्ये बनावट दारु खचाखच भरलेली असतना संध्याकाळ होत आली तरी पेडणे अबकारी खात्याचा एकही अधिकारी घटनास्थळी अजून दाखल झाले नसल्याची माहिती.पोलिस घटनास्थळी हजर.‌ लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना ऊत.

निराधार महिलेला विश्वजीत राणे स्वखर्चाने बांधून देणार नवीन घर

मालपण सत्तरी येथील निराधार महिलेला आता मिळणार नवीन घर, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे स्वखर्चाने बांधून देणार नवीन घर

मालपण सत्तरी येथे श्रीमती पांढरी गावकर या निराधार महिलेचे घर कोसळले

मालपण सत्तरी येथे श्रीमती पांढरी गावकर या निराधार महिलेचे राहते घर एका बाजूचे भर पावसात कोसळले, सदर घटना शनिवारी रात्री घडली.

वाळपईत धोकादायक स्थितीत वीज खांब; कोणत्याही क्षणी होऊ शकते दुर्घटना

वाळपई शहरातील काही वीज खांब धोकादायक स्थितीत असून, कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः वाळपई पोलिस स्थानक मार्गावरील व्याघ्रेश्वर सदर इमारतीजवळील मुख्य रस्त्यावर असलेला एक वीज खांब अत्यंत वाकलेला असून, त्याच्या मुळाशी असलेली माती वाहून गेल्यामुळे तो अधिक अस्थिर झाला आहे.

महिला पंचाचा विनयभंग करूनही आज पर्यंत पोलिसांकडून संशयिताला अटक केली नाही

कोरगाव पंचायत मधील एका महिला पंचाचा विनयभंग करूनही आज पर्यंत पोलिसांकडून संशयिताला अटक केली नाही त्यांनी,त्याला त्वरित अटक करावी,अशी मागणी कोरगाव पंचायतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली

सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड

सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. मंगळवारी पहाटे कोलकाता विमानतळावर नियोजित थांब्यादरम्यान प्रवाशांना विमानातून उतरावे लागले.

गोवा-सोलापूर विमान सेवेमुळे तस्करीत होणार वाढ? कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदेंकडून भिती व्यक्त

काही दिवसांपूर्वीच गोवा - सोलापूर विमान सेवा सुरू झाली आहे. ह्या विमान सेवेमुळे गोव्यातून तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भिती सोलापूरच्या खासदार आणि कॉंग्रेस नेत्या प्रणिती सुशिलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे‌.

पणजीतील पाणी पुरवठा बंद

पणजीत मंगळवारी सकाळपासून पाणी पुरवठा नाही. ओपा येथील पाणी उपसा केंद्रावर काल सोमवारी संध्याकाळी पणजीला पाणी पुरवठा करणारी 40 एमएलडी वाहिनी फुटली. त्याचा परिणाम आज तिसवाडी तालुक्यात काही भागातील पुरवठ्यावर दिसून आला.

प्रतापनगर - धारबांदोडा खून प्रकरण,फोंडा पोलिसांना मोठे यश

प्रतापनगर- धारबांदोडा येथील युवतीच्या खून प्रकरणी संशयीताला बॅंगलोरहून घेतले ताब्यात. २४ तासात मृत युवतीची ओळख पटवून संशयीताला ताब्यात घेण्यात फोंडा पोलिसांना मोठे यश.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

SCROLL FOR NEXT