International Poetry Day Dainik Gomantak
गोवा

मनसा क्रिएशन्सतर्फे पणजीत आज आंतरराष्ट्रीय कविता दिवस

मिरामार पणजी येथे "काव्योत्सव" आयोजित करण्यात आला

दैनिक गोमन्तक

पणजी: मनसा क्रिएशन्सतर्फे सोमवार दि. 21 रोजी आंतरराष्ट्रीय कविता दिवस साजरा करण्यात येत असून , त्यानिमित्ताने मिरामार पणजी येथे "काव्योत्सव" आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 2.30 वाजता काव्योत्सवाचे उद्‍घाटन होईल. त्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष, कवी, गीतकार दशरथ परब या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष निमंत्रित म्हणून माहिती व प्रसिद्धी संचालनालयाचे सहा.माहिती अधिकारी, श्याम गावकर उपस्थित राहणार आहेत.

गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष राजमोहन शेट्ये, मिरामार युथ हॉस्टेलचे संचालक अनंत जोशी यांचीही विशेष उपस्थिती असेल. उदघाटन सत्रानंतर कवी गौरीश वेर्णेकर यांच्या अध्यक्षतेखाली "काव्यरंग" कविसंमेलन होणार आहे. यात दशरथ परब, श्याम गावकर, राजमोहन शेट्ये, अनंत जोशी, राजू नाईक, जॉन आगियार, दुर्गाकुमार नावती , प्रदीप नाईक, प्रकाश क्षीरसागर, विठ्ठल शेळके, नवसो परब यांचा सहभाग असेल. त्यानंतर प्रा.पौर्णिमा केरकर यांच्या अध्यक्षतेखाली "काव्यपंचमी" कविसंमेलन होणार आहे.

यात मीना समुद्र, सृष्टी नाईक, अंजली आमोणकर, इंदू परब, डॉ.नीता तोरणे, प्रमोद कारापूरकर , डॉ. आरती दिनकर, नूतन दाभोळकर , अपर्णा भोबे, सुभाष शाह, दीपा मिरिंगकर, सुनीता शाह, डॉ. सुनेत्रा कळंगुटकर, आरती मोने, मेघना कुरुंदवाडकर, अपूर्वा करपे, अक्षता किनळेकर, डॉ. सारिका अडविलकर, तृप्ती बांदेकर, स्नेहा सुतार, डॉ. गीता गावस, आसावरी कुलकर्णी, प्रा.अंजली चितळे, चित्रा क्षीरसागर, स्नेहा केणी, धनश्री कुरुंदवाडकर, बबिता गावस, माधुरी उसगावकर, वर्षा प्रभुगावकर, शर्मिला प्रभू, तेजश्री प्रभुगावकर, विंदा काकोडकर, डॉ.स्वेता गावस, कविता आमोणकर, अनुया शिरोडकर, भक्ती सरदेसाई, सई भाटे, मंदा सुगीरे, गौतमी चोर्लेकर, राधिका काळे कुलकर्णी, सविता सामंत, गौरी भालचंद्र, स्नेहा जोशी, समृद्धी केळकर आदिंचा सहभाग असेल. याबाबतची माहिती मनसा क्रिएशन्सच्या अध्यक्ष कालिका बापट यांनी दिली. सूत्र निवेदन रजनी रायकर करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बहिणीच्या छातीवर बुक्की मारली, आमची लायकी काढली; मुंबईतील 13 पर्यटकांना लुथरा बंधुंच्या कल्बमध्ये मारहाण, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

अग्रलेख: ‘आत्मघाती’ पळवाटा कशा थांबवायच्या? कमी गुण मिळाल्याने मुलांनी संपवले जीवन; पालक, शिक्षक अन् समाजासाठी धोक्याची घंटा

Verna Fire: गोव्यात 'आगीचं सत्र' सुरूच! हडफडे घटनेची धग कायम असतानाच, वेर्णा येथील भंगारअड्ड्याला भीषण; कारण अस्पष्ट

Mapusa Accident: म्हापसात भीषण अपघात! 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; पोलिसांकडून पुढील तपास सुरु

Banks New Verification Rule: ऑनलाइन फ्रॉडला आता 'ब्रेक'! देशभरातील बँकांकडून पडताळणीच्या नियमांमध्ये मोठे बदल

SCROLL FOR NEXT