Goa Liberation Day 2022 | Goa University | CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Liberation Day 2022: गोवा मुक्तीदिनानिमित्त आज विविध ठिकाणी होणार ध्वजारोहण

Goa Liberation Day 2022: गोवा विद्यापीठ मैदानावर राज्यस्तरीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Liberation Day: गोवा मुक्तीदिन आज 19 रोजी राज्यात विविध ठिकणी साजरा करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय ध्वजारोहण समारंभ गोवा विद्यापीठ मैदान (हेलिपॅड क्षेत्र) ताळगाव येथे होणार आहे. मुख्यमंत्री, सभापती, मंत्री, विरोधी पक्षनेते, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, महाधिवक्ता आणि इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) ध्वजारोहण केल्यानंतर परेडचे निरीक्षण करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे स्वागत महसूलमंत्री आंतानासिओ ऊर्फ बाबूश मोन्सेरात, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक करतील. पोलिस बँडद्वारे राष्ट्रगीत आणि पोलिस गार्ड ऑफ ऑनरने राष्ट्रध्वज फडकवला जाईल.

तसेच, यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. पोलिस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना जाहीर झालेल्या मुख्यमंत्री पदकाचे वितरण केले जाणार आहे. या व्यतिरिक्त आरोग्य, कृषी तसेच समाज कार्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा यावेळी सत्कार केला जाणार आहे.

विविध तालुका मुख्यालयात मंत्री व आमदारांच्या हस्ते सकाळी 9.15 वाजता ध्वजारोहण समारंभ होणार आहे. मडगाव येथे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते समारंभ पार पडेल. फोंडा येथे कृषिमंत्री रवी नाईक ध्वजारोहण करतील. पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हापसा येथे ध्वजारोहण करणार आहेत.

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो वास्को येथे ध्वजारोहण करतील. काणकोण येथे सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर पेडणे येथे ध्वजारोहण करतील. आमदार दिव्या राणे वाळपई येथे ध्वजारोहण करतील.

समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते सांगे येथे ध्वजारोहण, क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते केपे येथे, डिचोली येथे आमदार प्रेमेंद्र शेट आणि जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते धारबांदोडा येथे ध्वजारोहण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT