Tobacco products Dainik Gomantak
गोवा

Tobacco productsची गोव्यातील शैक्षणिक सस्‍थांजवळ होतेय विक्री

‘बीग टोबॅको टिनी टार्गेट’ (Big Tobacco Tiny Target) सर्वेतून उघड झाली धक्कादायक बाब

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा (Goa) राज्यातील 97 शैक्षणिक संस्थांच्‍या 100 मीटर अंतराच्या आत तंबाखूजन्य पदार्थांची (Tobacco products) विक्री होत असून ती धोकादायक असल्याचे दोनापावला येथे झालेल्या कार्यशाळेत सांगण्यात आले. ‘बीग टोबॅको टिनी टार्गेट’ या सर्वेमध्ये ही गोष्ट उघड झाली आहे. हा सर्वे ‘व्‍हाईस’ या संस्थेने केला आहे.

दिल्ली येथील ‘व्‍हाईस’ या तंबाखू नियंत्रण संस्थेच्या सहकार्याने मणिपाल इस्पितळात आयोजित तंबाखू नियंत्रण कार्यशाळेत वरील सर्वेचे अनावरण झाले. या कार्याशाळेचे उद्‌घाटन केल्यानंतर आरोग्य खात्याचे सचिव रवी धवन यांनी सांगितले की, सरकार मुलांनी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करु नये यासाठी सतर्क आहे. तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी आवश्‍यक ती पावले सरकार उचलत आहे.

दोनापावला येथील मणिपाल इस्पितळात शनिवारी तंबाखू नियंत्रण कार्यशाळा पार पडली.यावेळी नगरविकास खात्याचे सचिव तारीक थॉमस, तंबाखू नियंत्रण संघटना (नोट) भारतचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर, ‘व्‍हाईस’ च्या सीओओ अश्‍मी सानियाल, मणिपाल इस्पितळाचे गोवा प्रमुख मनीष त्रिवेदी, ॲड. अमरसिंह राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे गंभीर आजार लक्षात घेता त्यावर कडक नियंत्रण गरजेचे आहे. सरकार तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांवर योग्य ते उपचार करुन लोकांचे जीव वाचवत असले तरी तंबाखूचा वापर होऊच नये यासाठी खास उपायांची गरज असल्याचे तारीक थॉमस म्हणाले.

इ-सिगारेट ही सध्याच्या आधुनिक युगात युवकांसाठी आकर्षण करणारी वस्तू ठरली असून त्यावर नियंत्रण गरजेचे असल्याचे डॉ. साळकर म्हणाले. राज्यातील 97 शैक्षणिक संस्थाच्या 100 मीटर अंतराच्या आत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते ही फारच चिंताजनक बाब असल्याचे सानियल यांनी सांगितले. इतर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. शैक्षणिक सस्‍थांपासून 100 मी. अंतराच्‍या आत होतेय तंबाखूजन्य पदार्थांची विक्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT