Traditional Business Dainik Gomantak
गोवा

Traditional Business: पारंपरिक व्यवसाय पुनर्जिवीत करणार- प्रदीप सरमोकादम

जैवविविधता मंडळाचा स्तुत्य प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

Traditional Business जैवविविधता मंडळाकडून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत असून पारंपारिकरीत्या चालणारे व्यवसाय बंद पडू नये, यासाठी मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. याचा भाग म्हणून आता ग्रीन स्किलिंग उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली.

ते पुढे म्हणाले, ज्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने बांध बांधणे, झाडावर चढणे, रेंदेर प्रशिक्षण आणि तळ्यांचे बांधकाम केले गेले आहे. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कौशल्यपूर्ण करून यातून उपजिविका निर्माण करण्याचा या मागचा हेतू आहे, राज्यातील बांध, कुळागर आणि तळांचे बांधकाम पूर्वी पारंपरिक पद्धतीने केले जात होते, परंतु हल्लीच्या काळात पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

युवा वर्गानेही या व्यवसायात यावे, तळांचे बांधकाम पूर्वी पारंपरिक पद्धतीने केले जात होते, परंतु हल्लीच्या काळात पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. युवा वर्गानेही या व्यवसायात यावे, यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. एखादा या व्यवसायात तरबेज झाल्यानंतर त्यांच्या व्यवसायालाही प्रतिष्ठा येणार आहे, असे सरमोकादम यांनी स्पष्ट केले.

ग्रीन उपक्रमासाठी समिती

ग्रीन उपक्रमासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. सध्या उपक्रमाअंतर्गत राज्यात अनेक ठिकाणी लहान कामे हाती घेण्यात आली आहेत. यात चोडण येथील पारंपरिक पद्धतीने गुळाचा वापर करून सुमारे 500 मीटर बांधाचे बांधकाम करण्यात आले आहे.

तसेच सावईवेरे येथील तळे, कुडतरी येथील शेतातील पारंपरिक छोटे बांध दुरुस्तीची कामे करण्यात आली. पंचायतींना या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. त्याशिवाय शिक्षकही सहभागी झाले आहेत. पारंपरिक व्यवसायातील कौशल्य पुनरुज्जीवित करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT