Goa Fire Cases : आगीचा भडका सुरूच! चिंबलमधील पेपर फॅक्टरीला भीषण आग

मागील काही दिवसांपासून गोव्यातील आगीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
Fire in Goa
Fire in GoaDainik Gomantak

Goa Fire Cases : मागील काही दिवसांपासून गोव्यातील आगीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागल्यापासून या घटना वारंवार घडत आहेत. ताज्या माहितीनुसार, इंदिरानगर-चिंबल परिसरात असलेल्या एका पेपर फॅक्टरीला आज पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागली आहे.

Fire in Goa
Fire in Goa: म्हादई अभयारण्यात वणवा

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. यावेळी जुने गोवे, पणजी आणि पर्वरी अग्निशमन दलाच्या जवानांनी एकत्रितपणे काम करून या आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत नेमके किती आर्थिक नुकसान झाले, किंवा कोणती जीवितहानी झाली असल्याची सविस्तर माहिती अद्याप कळू शकली नाही.

दरम्यान, म्हादई अभयारण्यातील नगरगाव-सत्तरी पंचायत क्षेत्रातील साट्रे गावामधील क्रांतीवीर दीपाजी राणेंचा गड म्हणून प्रसिद्ध असलेले जंगल वणव्यामुळे आग लागून जळून खाक झाले आहे. शेकडो हेक्टरवर पसरलेल्या या आगीत दुर्मीळ जैवविविधता नष्ट झाल्याची भीती आहे.

तसेच काही बागायतगारांचे काजू पिकही भस्मसात झाले असून लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग कोणी लावली की लागली? याबाबत संशय आहे.

Fire in Goa
Cars Gutted In Fire: आगीचे सत्र सुरूच; वास्कोत चार चारचाकी जळून खाक

दुसरीकडे, झुआरीनगर येथील बिर्ला पोलिस चौकीबाहेर उभ्या असलेल्या 4 चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या. ही घटना काल दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत 20 लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वास्को अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरड्या गवताला आग लागल्यामुळे तेथे पार्क केलेल्या 4 चारचाकी पेटल्या. या 4 चारचाकी वाहनांपैकी 1 टॅक्सीही या दुर्घटनेत जळून खाक झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com