Tivim Comunidade Election Dainik Gomantak
गोवा

Tivim Comunidade Election: मतदान प्रक्रियेवर गावकारांचा बहिष्कार! थिवी कोमुनिदाद निवडणूक ठरली वादळी; मतदानासाठी बोगस ओळखपत्रांचा वापर

Fake Voter ID allegations Tivim: बिगर गोमंतकीयांनी मतदानासाठी बोगस ओळखपत्र आणल्याचा आरोप काही गावकारांनी केल्याने याठिकाणी तणावाचे तसेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: थिवी कोमुनिदाद निवडणुकीवेळी काही गावकारांना मतदान करण्यास मज्जाव केल्याने तसेच बिगर गोमंतकीयांनी मतदानासाठी बोगस ओळखपत्र आणल्याचा आरोप काही गावकारांनी केल्याने याठिकाणी तणावाचे तसेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच सुमारे ५० हून अधिक गावकारांनी या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकून सभात्याग केला. तसेच निवडणूक प्रक्रियेच्या गैरव्यवस्थापनावर टीका करीत याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला.

निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे व कायद्याच्या चौकटीत पार पडली असून आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. आरोप करणाऱ्यांनी योग्य प्राधिकरणाकडे विषय मांडावा, असे नवनिर्वाचित समितीच्या सदस्यांनी निवडणुकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले.

रविवारी, (ता. १५) सकाळच्या सत्रात थिवी कोमुनिदादची निवडणूक (Election) झाली. यावेळी काही गावकारांची नावे मतदान यादीतून वगळल्याने अनेकांनी याला तीव्र आक्षेप घेतला. परिणामी निवडणूकस्थळी गोंधळ व तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. कोलवाळ पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली.

नवनिर्वाचित अ‍ॅटर्नी सावियो परेरा म्हणाले की, या आरोपांमध्ये तथ्य नाही. संबंधितांनी योग्य प्राधिकरणाकडे विषय मांडावा. पीठासीन अधिकारी, पोलिस तसेच आमच्या गावकारांच्या (कोमुनिदाद सदस्य) उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया योग्यरित्या पार पडली. काही दिवसांपूर्वी काहींनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, संबंधितांची याचिका न्यायालयाने (Court) फेटाळली होती, असे ते म्हणाले.

लिओ परेरा यांची निवड

थिवी कोमुनिदादच्या अध्यक्षपदी लिओ परेरा यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी नोलंड डिसोझा, अ‍ॅटर्नी - सावियो परेरा, खजिनदार - अलॉयसिस, सब-अ‍ॅटर्नी फिलीप लिमा, उपखजिनदार - जेम्स डिसोझा यांची निवड झाली.

आजच्या निवडणुकीत कुठलीच फसवणूक झालेली नाही. सर्व गोष्टी पारदर्शकतेप्रमाणे पार पडल्या. सुमारे ४०२ गावकारांनी मतदानाचा हक्क बजावला. राहिला प्रश्न बाहेरून मतदार आल्याचा. आमचे गावकार कर्नाटक, गुजरात, ओडिसा व शेजारील राज्यांत वास्तव्यास आहेत. इतर कोमुनिदादीचे देखील अशाचप्रकारे मतदार (गावकार) शेजारील राज्यांत विखुरलेले आहेत.

सावियो परेरा

मुख्त्यारपदी सावियो परेरा

मुखत्यारपदी साविओ परेरा यांची निवड करण्यात आली, खजिनदारपदी आलोयसिस सिक्वेरा यांची बिनविरोध निवड झाली. बदली अध्यक्ष म्हणून नोलन डिसोझा, बदली ॲटर्नी म्हणून फिलिप लिमा तर बदली खजिनदार म्हणून जेम्स डिसोझा यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने जाहीर केले. धीरेन बाणावलीकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले. त्यांना मोहन नार्वेकर यांनी साहाय्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa State Film Festival: सिनेमा, कलेसाठी सरकारचे सातत्याने योगदान! CM सावंतांचे प्रतिपादन; राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून आणले गोव्यात, विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार; 18 वर्षाच्या तरुणाला अटक

Droupadi Murmu: 'ऑपरेशन सिंदूर इतिहासात नोंदवले जाईल'! राष्ट्रपती मुर्मूंचे गौरवोद्गार; अर्थव्यवस्थेची सक्षमता केली अधोरेखित

Horoscope: 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक! थोडी सावधगिरी बाळगा, जोखीम टाळा

Goa Coconut Price: नारळ महागले! सरकारचे मोठे पाऊल; मिळणार 'इतक्या' दराने, Watch Video

SCROLL FOR NEXT