Bhandari Samaj Election: भंडारी समाजाची नवी निवडणूक प्रक्रिया वादात! घटना दुरुस्ती रद्द; निबंधकांकडून आदेश जारी

Gomantak Bhandari Samaj: गोमंतक भंडारी समाज संस्थेच्या केंद्रीय समितीच्या वादाला आता वेगळे वळण लागले आहे. या समितीचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या समितीने घेतलेली मुदतवाढ ही योग्य प्रकारे घेतली नसल्याचा निवाडा देण्यात आला आहे.
Gomantk Bhandari Samaj
Bhandari SamajDainik Gomantak
Published on
Updated on

Gomantak Bhandari Samaj Election Dispute

पणजी: गोमंतक भंडारी समाज संस्थेच्या केंद्रीय समितीच्या वादाला आता वेगळे वळण लागले आहे. या समितीचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या समितीने घेतलेली मुदतवाढ ही योग्य प्रकारे घेतली नसल्याचा निवाडा देण्यात आला आहे. या समितीने केलेल्या घटना दुरुस्त्या रद्द केल्याने त्या दुरुस्तींच्या आधारे घेण्यात आलेली नवी निवडणूक प्रक्रियाही वादात सापडली आहे.

अध्यक्ष अशोक नाईक यांची समिती कार्यरत असताना ७ मार्च २०२१ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये करण्यात आलेल्या घटना दुरुस्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना १८ ऑक्टोबर २०२३ रोजी केंद्रीय कार्यकारी समितीने मान्यता दिली होती. योग्य प्रकारे घटना दुरुस्ती न झाल्याने त्या रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा संस्था निबंधकांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Gomantk Bhandari Samaj
Goa Police: कायद्याच्या रक्षकांकडूनच त्रास; दिल्लीच्या पर्यटकांशी गैरवर्तन, गोव्यात तीन वाहतूक पोलिस निलंबित

दरम्यान, समाजाचे नेते उपेंद्र गावकर व अन्य या निवाड्यावेळी उपस्थित होते. त्यांनी बेकायदा घटनादुरुस्तीद्वारे घेतलेल्या निवडणुकीत जिंकलेल्या देवानंद नाईक यांच्या समितीस आव्हान देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Gomantk Bhandari Samaj
Cash For Job Scam नंतर गोव्यात जमीन घोटाळ्यांचा धुमाकूळ, रूपांतरणांविरुद्ध मजबूत ठराव करा; चोडणकरांचे पंचायतींना आवाहन

दिले होते आव्‍हान

1. या घटना दुरुस्तीमुळे समाजाबाहेरील व्यक्तीसोबत विवाह केलेली, तीन वार्षिक सभांना गैरहजर आणि वयाची पन्नाशी न गाठलेली व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवली‌ गेली‌ होती.

2. या अन्याय्य तरतुदीविरोधात ॲड. अनिश बकाल आणि ॲड आतिश मांद्रेकर यांनी जिल्हा संस्था निबंधकांसमोर आव्हान दिले होते. त्यावर निवाडा देताना जिल्हा संस्था निबंधक तुषांत कुंकळ्येकर यांनी या घटना दुरुस्त्या रद्द केल्या आहेत.

3. घटना दुरुस्तीनंतर घेतलेल्या निवडणुकीत देवानंद नाईक हे अध्यक्षपदी निवडून आले‌ आहेत. त्यांच्या निवडीलाही आव्हान दिले‌ होते‌; मात्र तो स्वतंत्र विषय असल्याने या निवाड्यात त्याचा विचार करण्यात आला नसल्याचेही जिल्हा संस्था निबंधकांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com