Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: तटरक्षक दलाच्या विमान टायरला लागली आग

धावपट्टी साफ झाल्यानंतर उड्डाणे पुन्हा सुरू

दैनिक गोमन्तक

वास्को: दाबोळी विमानतळावर धावपट्टीवर उतरताना तटरक्षक दलाच्या विमानाच्या टायरला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी साडे बारा वाजता घडली. या नंतर दुपारी सुमारे 1 वाजता धावपट्टी साफ झाल्यानंतर उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली.

तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी साडे बारा वाजता तटरक्षक दलाचे विमान दाबोळी विमानतळावर उतरत असताना गार्ड डॉर्नियर विमानाचा टायर लँडिंग दरम्यान अचानक फुटला. यावेळी डाव्या टायरला आग लागली.

या घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले. या घटनेत कोणती ही जीवित हानी झाल्याची अद्याप माहिती समोर आली नाही. या नंतर धावपट्टी साफ करण्याचे काम सुरू करण्यात आले.

या घटनेमूळे दाबोळी विमानतळावरील सर्व विमानांना लँडिंगसाठी सुमारे 30 मिनिटे उशीर झाला. त्यानुसार सहा विमानांचे आगमन व उड्डाणे स्थगित करण्यात आली होती. आणखी विलंब झाल्यास उड्डाणे वळवण्याची शक्यता होती. मात्र सुमारे 1 वाजता धावपट्टी साफ झाल्यानंतर विमानांची उड्डाणे व आगमन पुन्हा सुरू करण्यात आली. ज्याच्यामूळे सर्व विमान वाहतूक सुरळीत होऊ शकली आहे.

कळंगुट प्रभागात 79.47 टक्के मतदान

बुधवार दि. 10 ऑगस्ट रोजी राज्यात पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत स्थगित ठेवण्यात आलेल्या कळंगुटच्या प्रभाग 9 चे मतदान आज पार पडले. ही मतदान प्रक्रिया मतदारांच्या उत्साही वातावरणात पार पडली. प्रभागात 79.47 टक्के मतदान झाले आहे. काल गोवा राज्याचं ही मतदान पार पडले.

10 ऑगस्ट रोजी राज्यात पार पडलेल्या मतदानाचा टक्का 78.70 टक्के इतका आहे. तसेच आजच्या मतदानाचा टक्का ही 79.47 इतका आहे. आज राज्यात नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन साजरा होत असतानाही सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांनी हजेरी लावत आपले कर्तव्य बजावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT